लघुउद्योग देश विकासाचा पाया बनावा – कृषि दुत

प्रतिनिधी :- देशातील लघु उद्योग विकास व्हावा अशी इच्छा सगळ्यांच्या मनात असली पाहिजे या उद्योगाचे स्वरूप बदलले पाहिजे लघु उद्योगाचा विकास होऊन तो देश विकासाचा पाया बनवा अस मत कृषि दुत यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संचलित रत्नाई कृषी महाविद्यालय, अकलूज आयोजित ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत बोधित केले.

एखाद्या उद्योगात टिकून राहायचं असेल व्यवसायात यशस्वी व्हायचं असेल तर सतत व्यवसायाचा विकास करत राहने गरजेय आहे. घरबसल्या आपण आपल्या बजेटमध्ये बसतील आणि करायलाही सोपे असतील असे कित्येक व्यवसाय आहेत. त्यात यांनी केळी वेपर्स कसे बनवावे याचे प्रात्यक्षिक धर्मपुरी येथील ग्राम संघातील महिलाना करून दाखवले. कमी जागा आणि कमी भांडवल लागणारा हा व्यवसाय आहे तसेच यासाठी लागणारी सर्व साहित्य आणि सुविधा या घरी सहज उपलब्ध असतात. महिलांना घरातील कामातुन वेळ काढून करण्यायोग्य ह्या व्यवसायाचे महत्व पटवून दिले.त्यासाठी यांना या प्रात्यक्षिकेच्या आयोजनासाठी शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित रत्नाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य आर. जी. नलावडे, कार्यक्रम समन्वयक प्राध्यापक एस. एम. एकतपुरे, कार्यक्रम अधिकारी प्रा एम. एम. चंदनकर आणि प्रा. एच. व्ही. कल्याणी यांचे मार्गदर्शनानुसार कृषिदूत शेखर पठाडे, अनुप परदेशी, अनिकेत सरवदे, रोहन पाटील, ओंकार पाटेकर, प्रशिक नगराळे, विशाल पराडे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज