गरीब शेतकरी कुटुंबातील मुलीचे घवघवीत यश MBBS मध्ये तिची निवड

प्रतिनिधी :-माळशिरस तालुक्यातील लवंग येथील कु.अक्षता शरद वाघ हिने नीट परीक्षेमध्ये ७२० पैकी ५६६ गुण मिळवून तीने घवघवीत यश संपादन केले आहे तसेच सीईटी परीक्षेमध्ये ९९.२४% गुण मिळवून यश संपादन केले असून या यशाबद्दल मराठा सेवा संघ पुणे विभागाचे वतीने तिचा सन्मान करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या,

एका गरीब मराठा शेतकऱ्याच्या मुलीने घवघवीत यश संपादन केल्यामुळे तालुक्यात तिचे कौतुक होत आहे.या यशामध्ये तिचे वडील शरद चांगदेव वाघ व विद्या शरद वाघ यांचा मोलाचा वाटा आहे यांचे मार्गदर्शन लाभले असून यावेळी लक्ष्मीनारायण नगर अकलुज या ठिकाणी शिवमती वनिता बाळासाहेब कोरटकर पुणे विभागीय सचिव,हेमलता मुळीक,भारती माने,तेजश्री जाधव,स्वाती आवड,ज्योती ढेंबरे लता वाघ यांनी तिचा शाल, पुस्तक व मराठा सेवा संघाचे कॅलेंडर देऊन सन्मान केला.व पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज