लोकशाहीर डॉ.आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना भारतरत्नासह ज्ञानपीठ पुरस्कार देण्याची पीपल्स रिपब्लिकन पार्टीची मागणी

अकलूज प्रतिनिधी :-
राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रा.जोगेंद्रजी कवाडे सर,राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदिपभाई कवाडे व राज्य उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने लोकशाहीर डॉ.आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अकलूज येथील पुतळ्याला महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
त्यानंतर अकलूजचे उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांना लेखी निवेदनाद्वारे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अभूतपूर्व योगदान देणारे आणि आपल्या साहित्यरुपी लेखणीतून समाज परिवर्तनाचे नवक्रांतीबाज व परिवर्तनवादी विचार जनमानसात रुजविणारे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना १ ऑगस्ट २०२३ रोजी त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून भारतरत्नासह साहित्य क्षेत्रातील ज्ञानपीठ पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी केली आहे सदरचे निवेदन प्रांत कार्यालयाच्या नायब तहसीलदार देसाई मॅडम यांनी स्वीकारले.
यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे माळशिरस तालुका कार्याध्यक्ष हेमंत कांबळे, तालुका सरचिटणीस दयानंद कांबळे,तालुका संघटक पांडुरंग चव्हाण,युवक तालुका संपर्कप्रमुख शिवम गायकवाड,अकलूज शहर कार्याध्यक्ष शिवाजी खडतरे,राजू बागवान,आकाश गायकवाड,अनिकेत शिंदे,शहाजी खडतरे,मन्सूर काझी, ऋषिकेश गायकवाड,अर्जुन कोळी,सागर कोळी,सया शिंदे,सोहेल शेख दिपक बाबर,आदेश थोरात,ऋतुराज थोरात या सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांचेसह राष्ट्रवादीचे अकलूज शहराध्यक्ष अविनाश सोनवणे यावेळी उपस्थित होते.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज