अकलूजचे सुप्रसिद्ध वकील एम.जी.तांबोळी यांचा दिल्ली येथे पुरस्काराने सन्मानित

अकलूज दि.३ (प्रतिनिधी):सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील सुप्रसिद्ध वकील व इंडीयन प्रेस क्लब महाराष्ट्रचे कायदे विषयक सल्लागार व राज्य संघटक एम.जी.तांबोळी वकील यांना नुकताच दिल्ली येथील भारतरत्न डॉ.बी.आर.आबेडकर भारत भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.सदरचा पुरस्कार ३ डिसेंबर २०२३ रोजी नवी दिल्ली येथे सत्यनारायण जातीया व श्री मनीष गवई यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आला आहे. यावेळी ग्लोबल फौडेशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्यातील हा वकिलांना देण्यात येणारा पहिला पुरस्कार आहे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.आज संविधान सन्मान दिवस व वकील डे निमित्त या पुरस्कारचे आयोजन दिल्ली येथे करण्यात आले होते.

एम.जी.तांबोळी वकील यांनी अत्यंत गरीब परिस्थित त्यांनी वकिलीची परिक्षा देऊन सर्व सामान्य व गोरगरीब लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी वकील व्यवसाय सुरू केला आहे. वकिली व्यवसाय बरोबर त्यांनी गरीब मुलांचे शिक्षण,गरीब लोकांच्या मुला-मुलीचे विवाहसाठी सतत मदतीचा हात दिला आहे.सध्या ते 40 वर्षाहुन अधिक काळ वकिली व्यवसाय करीत आहे या सामाजिक कार्याची माहिती घेऊन आंबेडकर ग्लोबल फॉडेशनने दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला आहे. सदरचा कार्यक्रम हा डेप्युटी स्पीकर हॉल इन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया नवी दिल्ली इथे आयोजित करण्यात आला होता.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज