माढा मतदारसंघासाठी इच्छुक : तुकाराम साळुंखे पाटील

अकलूज : ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार’कडून माढा लोकसभा मतदार संघातून उमेदवारीसाठीची मागणी राज्याचे प्रदेशाध्यक्ष माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली असल्याचे तुकाराम साळुंखे पाटील यांनी सांगितले.

जय हिंद महाराष्ट्र राज्य कल्याणकारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तुकाराम साळुंखे पाटील सोलापूर जिल्हा परिषद बांधकाम खाते येथे मस्टर कारकून म्हणून गेली सतरा वर्षे काम केले आहे.. तसेच नंतर महसूल विभागात माळशिरस व माढा तालुक्यात तलाठी या पदावर काम केले असून ते तलाठी संघटनेचे उपाध्यक्ष माढा येथे होते. माळशिरस येथे तलाठी संघटनेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. त्यांना प्रशासनाचा चांगला अनुभव असून जनसंपर्क हा मोठा आहे. माळशिरस,माढा,करमाळा,पंढरपूर,सांगोला,फलटण,माण, खटाव,विटा,आटपाडी या तालुक्यात त्यांचे समाजाचे पाहुण्याचे नाते असल्याने अधिकारी, कर्मचारी, मजूर ,शेतकरी, कष्टकरी यांचा लोकसंपर्क असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ते राज्याचे संघटक सचिव असल्याने त्यांनी पक्षाकडे मागणी केलेली आहे. त्यांच्याकडे जनसंपर्क संघटन कौशल्य असून यापुढे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज,शाहू महाराज,आंबेडकर, फुले यांचे विचार घेऊन स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची विचारधारा धरून पुरोगामी महाराष्ट्र देशाचे नेते मा.श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांना साथ देतील म्हणून सर्व तरुण पिढीने ठरवले आहे. “जोडा धागा आणि कामाला लागा” या विचाराने शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षात गटात चैतन्य निर्माण झाले आहे.

“तुम्ही घड्याळ चोरी करू शकता पण वेळ नाही “अशी भावना देखील श्री.साळुंखे पाटील यांनी व्यक्त केली.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज