माढा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आणि प्रहार शेतकरी संघटनेच्या टीम चे मानेगावातील अपंग नैना जोकर यांच्या घरी सदिच्छा भेट आणि मदत

प्रतिनिधी :-माढा तालुक्यातील कर्तव्यदक्ष गट विकास अधिकारी सुळे साहेब आणि नैना जोकर यांची सोलापूर मध्ये दिव्यागाच्या दारी शासनाची वारी या कार्यक्रमात जिल्हा समन्वयक पंडित साळुंके आणि तालुका अध्यक्ष अमोल केसरे यांनी अपंगांचे कैवारी मा. राज्यमंत्री प्रहार चे सर्वेसर्वा बच्चु भाऊ कडू यांची भेट घालून दिली होती. बच्चु भाऊ कडू यांनी नैना कडे विशेष लक्ष देण्याबाबत गट विकास अधिकारी यांना सांगितले होते. कर्तव्यदक्ष गट विकास अधिकारी सुळे साहेब यांनी तातडीने पावले उचलत नैना जोकर यांना अपंग खुर्ची भेट दिली. तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ कसा देता येईल याबाबत ही सकारात्मक प्रतिसाद दिला. प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने अपंग नैना जोकर हिस वारंवार मदत केली आहे. ही 19 वर्षाची झाली असली तरी तिची उंची दीड फुटच आहे.तिला कोणत्याही प्रकारचे काम स्वतः करता येत नाही. प्रत्येक अडचणीत प्रहार ने तिला मदतीचा हात दिला आहे. प्रहार शेतकरी संघटना कायम अपंगांसाठी काम करत आहे. मागील काही दिवसात प्रहार चे वतीने अपंगाला अंतोदय योजनेत समावेश करून तालुक्यातील जवळजवळ 100 अपंगाच्या शिधा पत्रिकेचा अंतोदय शिधा पत्रिकेत समावेश करण्यात आला आहे. असे प्रहार संघटनेचे जिल्हा समन्वयक पंडित साळुंके यांनी सांगितले. अपंगांच्या पाठीशी प्रहार पुढेही कायम उभी राहणार असल्याचे मत प्रहार तालुका अध्यक्ष अमोल केसरे यांनी सांगितले. त्या प्रसंगी गट विकास अधिकारी सुळे साहेब, प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा समन्वयक पंडित साळुंके, माढा तालुका अध्यक्ष अमोल केसरे, ग्रामविकास अधिकारी गलगुंडे साहेब, युवा नेते बिरुदेव शेळके, महेश भोगे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज