गिरजनी चौक बायपास (महाराणा प्रताप चौक) या ठिकाणी तात्काळ गतिरोधक करा,अन्यथा 1 सप्टेंबर रोजी रस्ता रोको- महेश शिंदे

प्रतिनिधी :-अकलूज सार्वजनिक बांधकाम विभाग या हद्दीतील गिरजनी चौक बायपास (महाराणा प्रताप चौक) या ठिकाणी गतिरोधक करण्यात यावे याकरिता 2021 साली आपल्या कार्यालयाकडे निवेदन अर्ज देण्यात आला होता, परंतु रस्ते न झाल्याने त्या ठिकाणी गतिरोधक करण्यात आले नाहीत सध्या रस्ता दुरुस्त झाल्याने त्या ठिकाणी वाहनांची ये जा मोठ्या प्रमाणात असल्याने अपघात होत आहेत .

नुकताच 21/08/2023 रोजी त्या ठिकाणी मोठा अपघात झाला असून दोन्हीही पेशंट आयसीयू मध्ये आहेत. त्या ठिकाणी प्रत्येक महिन्याला अपघात होत आहेत . त्या ठिकाणी अपघात घडत असलेली तक्रार वारंवार संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्याकडे केली आहे, त्यामुळे त्वरित त्या ठिकाणी गतिरोधक/साईड पट्ट्या किंवा तात्काळ त्यावर काहीतरी मार्ग काढावा जाणे करून त्या ठिकाणी अपघात होणार नाहीत असे निवेदन मैत्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य व माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ यांच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज यांना देण्यात आले.

जर काम पूर्ण न झाल्यास 1 सप्टेंबर रोजी त्या चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा मैत्री प्रतिष्ठान महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष व माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ माळशिरस तालुका कार्याध्यक्ष महेश शिंदे यांनी दिला आहे. यावेळी मैत्री प्रतिष्ठान जिल्हा महिला अध्यक्ष नीता सुळे,मैत्री प्रतिष्ठान तालुका उपाध्यक्ष शंकर मस्के, कार्यकारणी सदस्य अजय मखरे आदी उपस्थित होते.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज