महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाच्या वतीने राज्यस्तरीय ११ वी ऊस परिषद आयोजित

 

प्रतिनिधी :-महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघ व मासिक ऊस संदेश आयोजित राज्यस्तरीय ” ११ वी ऊस परिषद” रविवार दिनांक १८/०२/२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता माहेश्वरी मंगल कार्यालय, कुडूवाडी रोड, माढा, ता. माढा, जि. सोलापूर येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. अतुलनाना माने-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

         सदर ऊस परिषदेत महाराष्ट्रातील ऊस शेतीचे आजचे चित्र सर्वांच्या नजरेसमोर आहे. ऊस शेती करणारे शेतक-यांची स्थिती बरीचशी नाजूक झाली असून ऊस शेतीमधील समस्या वाढत आहेत. या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी ऊस शेतीतील विचारवंत आणि ऊस शेतीशी पुरक उद्योजकांनी एकत्रित येवून या परिस्थितीवर योग्य चर्चा करून त्याचे कारण शोधून त्याच्यावर ठोस उपाययोजना सुचविण्याची गरज निर्माण झाली असून या गरजेची पुर्तता करण्यासाठीच महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाने राज्यस्तरीयत ऊस विकास परिषदेचे आयोजन केलेले आहे. सदर ऊस परिषदेत आधुनिक ऊसपिक तंत्रज्ञान विषयाचे मार्गदर्शन करण्यात येणार असून श्री. कृष्णात पाटील सांगाव राज्य तज्ञ संचालक ऊस संघ,हे खोडवा व्यवस्थापन’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत, तसेच श्री. शामकांत पाटील साहेब जैन एरिगेशन लि. चे महाराष्ट्र प्रमुख हे ऊस पीक व ठिबक सिंचन व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

        तरी सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी वरील ऊस परिषदेस उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन संघाचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. अतुलनाना माने पाटील यांनी केले. यावेळी पत्रकार परिषदेसाठी श्री. किरणभाऊ चव्हाण, श्री. समीर शेख, श्री, मदन मुंगळे, श्री. मुकुंद आरे इ. उपस्थित होते. आपल्या लोकप्रिय दैनिकामध्ये वरील प्रेस नोट प्रसिध्द करण्यात यावी ही विनंती.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज