महर्षी प्रशालेतील कलावंतांच्या दर्जेदार विविध गुणदर्शन नृत्याविष्कारला रसिकांनी दिली मनमुराद दाद

अकलूज दि.१४(प्रतिनिधी) :शेतकरी,गवळण,आराधना,भक्ती,लावणी,मंगळागौर अशा विविध पारंपारिक लोकगीतां बरोबरच दक्षिणात्य गीतातूनही महर्षी प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी प्रतिभा संपन्न नृत्याविष्कार सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. तर महर्षी वाद्यवृंदाच्या सादरीकरणालाही रसिकांनी मनमुराद दाद दिली. 

शिक्षण प्रसारक मंडळाच्या शंकरनगर येथील महर्षी प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन स्मृतीभवन येथे पार पडले.या वेळी विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे व महर्षी वाद्यवृंदाचे उद्घाटन आणि महर्षी द्वैवार्षिक अंकाचे प्रकाशन सार्व. बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सौ.सुनीता पाटील यांचेसह प्रशाला समिती सभापती ॳॅड.नितीनराव खराडे, संस्थेचे संचालक रामचंद्र गायकवाड,वसंत जाधव, बाळासाहेब सणस,प्रताप क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष पोपटराव भोसले या मान्यवरांच्या हस्ते झाले.

प्रास्ताविकात प्रशालेचे मुख्याध्यापक संजय गळीतकर यांनी प्रशालेची विक्रमी पटनोंदणी,कला,क्रीडा,साहित्यासह प्रशालेच्या गुणात्मक विकासाचा दैदिप्यमान आलेख मांडला.तर प्रमुख अतिथी सुनीता पाटील यांनी विद्यार्थ्यांना स्नेहसंमेलनासाठी शुभेच्छा देत अकलूज आपले माहेरघर असल्याचे सांगितले.

सकाळच्या सत्रात इ.८ वी ते १० वी व दुपार सत्रात इ.५ वी ते ७ वी व उच्च माध्यमिक विभागातील कलाकारांनी कलाविष्कार सादर केला.दुपार सत्रात शिक्षण प्रसारक मंडळाचे जेष्ठ मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते -पाटील यांनी कलाकारांना प्रोत्साहन देत पालकांनाही हे अविस्मरणीय क्षणाचे फोटो घेण्याची संधी दिली.विद्यार्थी प्रतिनिधी सादर करे व कु.वैभवी गोडसे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्सयात आला.

महषिॅ वाद्यवृंदानला संगीत शिक्षक बाळासाहेब झांबरे यांचे मार्गदर्शन लाभले.या स्नेहसंमेलनासाठी परीक्षक म्हणून धीरज गुरव व सुनील कांबळे यांनी काम पाहिले.

या कार्यक्रमासाठी प्रशाला समिती सदस्य कैलास चौधरी,अनिल जाधव, विनोद जाधव,नितीन इंगवले देशमुख, केंद्रप्रमुख विठ्ठल नष्टे,सूळ महाराज,भारत चंदनकर,अंकुश एकतपुरे उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन किरण सूर्यवंशी, प्रतिभा राजगुरू व नाझिया मुल्ला यांनी केले.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज