महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत महाराष्ट्रातील मजुरांचे व शेतकऱ्यांचे कुशल व अकुशल तेचे शेकडो कोटी रुपये पैसे शासनाने तात्काळ द्यावेत : युवा सेनेची मागणी

प्रतिनिधी :शिवसेना युवा सेना सचिव वरून सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना विभागीय सचिव अक्षय ढोबळे व युवा सेना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख उत्तम आयवळे यांच्या आदेशाने युवा सेना जिल्हाप्रमुख गणेश इंगळे व युवा सेना तालुका प्रमुख सुभाष काकडे युवा सेना अकलूज शहर प्रमुख शेखर खिलारे यांच्या वतीने महाराष्ट्र शासनाचे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनाचे शेकडो कोटी रुपये तात्काळ शेतकऱ्यांना व मजुरांना त्यांच्या खात्यात शासनाने जमा करावेत अशा आश्याचे निवेदन प्रांताधिकारी म्यॅडम यांना देण्यात आले.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने रोजगार हमी योजनेतून महाराष्ट्रात अनेक प्रकारची रोजगाराची वृक्ष लागवडींची कामे चालू आहेत . सध्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात शासनाने दुष्काळ जाहीर केलेला आहे . महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा जाणवत असल्याने शेतकरी वर्ग व मजूर वर्ग मेटाकुटीस आला आहे त्यांचे जगणे मुश्किल झाले आहे . दि 1 डिसेंबर 2023 ते 27 फेब्रुवारी 2024 पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील अकुशल चे 4 कोटी 84 लाख व कुशल चे 2 कोटी 39 लाख रुपये जमा झालेले नाहीत तसेच महाराष्ट्रातिल सर्व जिल्ह्यांचे मिळून अकुशलचे 403 कोटी रुपये शासनाकडे मजुरांचे पेंडिंग /बाकी आहेत . तसेच कुशलचेही शेकडो कोटी रुपये पेंडिंग आहेत. जर शासनाकडे एवढे पैसे बाकी असतील तर दुष्काळात मजूर वर्ग आपल्या कुटुंबाची उपजीविका कसा करेल त्याने जगायचे कसे .तो शेतकरी वर्ग व मजूर वर्ग आत्महत्या कडे वळू शकतो व त्याचे कुटुंब रस्ता वरती येऊ शकते त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांचे व मजुरांचे कुशल व अकुशल चे पैसे तात्काळ मजुरांच्या व शेतकऱ्यांच्या खात्या वरती जमा करावेत अन्यथा युवा सेना शेतकऱ्यांच्या व मजुरांच्या पैसे साठी लोकशाही मार्गाने लढा उभा करू असा ईशारा युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांनी दिला आहे यावेळी युवा सेना अकलूज उपशहर प्रमुख युवराज पवार प्रशांत पराडे पाटील विकास भोई सागर साळुंखे शुभम भोई सोन्या भोई मोन्या भोई इ युवा सैनिक उपस्थितीत होते.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज