महेश शिंदे यांच्या प्रयत्नातून साकारली सुंदर अंगणवाडी

 अकलूज/प्रतिनिधी-अकलूज नगरपरिषद हद्दीतील नवीन बाजार तळ येथील अंगणवाडी शाळेची अत्यंत दुरावस्था झालेली होती.राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब व सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने ६ जानेवारी २०२२ रोजी मैत्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश(भाऊ) शिंदे यांच्या संकल्पनेतून अंगणवाडी शाळेची दुरुस्ती व सुशोभीकरण करणे हा संकल्प मैत्री प्रतिष्ठान,नवीन बाजार तळावरील नागरिक व लोकनिधी च्या वतीने करून या लोकहितार्थ कार्यास प्रारंभ करण्यात आला होता.अखेर अल्पावधीतच महेश शिंदे यांच्या अथक प्रयत्नाने अंगणवाडी शाळेचे सुशोभीकरून आज अखेर अंगणवाडीच्या चित्रीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.

“मला जनतेचा विकास करण्यात रस आहे मला राजकारण करण्यात नाही ” ज्यांनी शब्द दिला होता त्यांनी पूर्ण नाही केला परंतु मी माझ्या युक्तीने व प्रयत्नाने ते पूर्ण करून घेतले. – महेश शिंदे 

हे कार्य सिद्धीस जात असताना अनेकांनी मदत केली तर अनेकांनी मदतीचे आश्वासन दिले परंतु ते आश्वासन हवेत विरले.तरीही महेश शिंदे यांनी खचून न जाता प्रशासकीय पातळीवरून सुद्धा हे प्रयत्न केले. व अखेर ज्या ठिकाणी देशाचे भविष्य घडणार आहे ज्या वयामध्ये संस्कार केले जातात ती गोरगरिबांच्या मुलांची अंगणवाडी शाळा दुरुस्त करून एक अभिनव उपक्रम राबविला आहे.या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या अंगणवाडी शाळेच्या लोकार्पणाचा कार्यक्रम लवकर संपन्न होणार आहे.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज