माळशिरस मधील स्मशान भूमीची दुरुस्ती तात्काळ करावी व लिंगायत समाजास स्वतंत्र स्मशान भूमी उपलब्ध करून द्यावी : युवा सेनेची मागणी

प्रतिनीधी: शिवसेना व युवा सेना सचिव वरुण  सरदेसाई, युवा सेना विभागीय सचिव अक्षय ढोबळे यांच्या आदेशाने, युवा सेना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख उत्तम आयवळे यांच्या मार्गदर्शनाखाली, युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे व शिवसेना विधानसभा तालुका प्रमुख महादेव बंडगर यांच्या उपस्थितीत,  युवा सेना विधानसभा तालुका प्रमुख मयूर सरगर यांच्या वतीने माळशिरस चे कार्यालय अधिक्षक विकास पवार यांना निवेदन देण्यात आले.

माळशिरस नगरपंचायत हद्दी मधील पुणे पंढरपूर रोड वरील सार्वजनिक स्मशानभूमी मध्ये प्रचंड गैरसोय आहे. त्यामध्ये मयत अंत्यविधीसाठी एक चौथरा सुध्दा व्यवस्थित नाही. पाण्याची गैरसोय होत आहे. अंत्यविधीसाठी आलेल्या लोकांची बसण्याची गैरसोय होत आहे. मृत्यू हा नैसर्गिक आहे.जर कदाचित एकाच दिवशी दोन किंवा त्यापेक्षा अधिक मयत झाले इतर मयतास जमीनीवरच अग्नी द्यावा लागतो. पावसाळ्याच्या दिवसात तर प्रचंड गैरसोय होत आहे. सदर गोष्ट अत्यंत गंभीर आहे. या विषयांचे महत्व लक्षात घेऊन नगरपंचायतीने लवकरात लवकर स्मशान भूमीचे नुतनीकरण करावे.तसेच माळशिरस हे तालुक्याचे ठिकाण आहे आणी माळशिरस मध्ये लिंगायत वाणी समाज खूप मोठ्या प्रमात आहे दुर्दव्याची बाब म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी लिंगायत वाणी सामाज्यास स्वतंत्र स्मशान भूमी नाही .लिंगायत वाणी सामाज्याची खुप दिवसांपासुनची स्वतंत्र स्मशानभूमीची मागणी आहे. प्रत्येक लिंगायत वाणी समाजातील व्यक्तीकडे स्वतः ची हक्काची जमीन नाही. त्यामुळे मृत्यू नंतर अंत्यविधीची मोठी गैरसोय होत आहे. त्या समाजासाठी स्वतंत्र स्मशानभूमी असणे अत्यंत आवश्यक आहे. मृत्यू नंतर त्या समाजातील मयतांची अवहेलना आपण किती दिवस करणार आहात.नैतिकदृष्ट्या ही बाब अत्यंत गंभीर आहे.जर मृत्यू नंतर सुध्दा मयताच्या अंत्यविधीस अडथळा निर्माण होत असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे.

     

      सदर विषयाची दखल नगरपंचायत कार्यालयाने 30 दिवसात घ्यावी अन्यथा युवा सेना 30 दिवसा नंतर नगरपंचायत कार्यालयासमोरच मयताचा अंत्यविधी केल्याशिवाय शांत बसणार नाही असा ईशारा युवा सेना विधानसभा तालूका प्रमुख मयुर सरगर यांनी दिला यावेळी युवा सेना उपतालुका प्रमुख दुर्वा आडके व दत्ता भाऊ साळूंखे , गणेश भिताडे, सागर साळूंखे, नवनाथ इंगळे, सागर इंगळे ई. युवा सैनिक उपस्थितीत होते.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज