मांडवे येथे कृषीदुतांच्या वतीने ग्रामीण जागरूकता कार्यनुभव कार्यक्रमाचे उद्घाटन

प्रतिनिधी :-मांडवे येथे कृषी सल्ला केंद्राचे उद्घाटन प्रसंगी उपस्थित गावचे कार्यकारी अधिकारी इतर कर्मचारी आणि ग्रामस्थ.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित व शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज यांचे संचलित रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज यांच्या वतीने ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमाचे उद्घाटन मौजे मांडवे तालुका माळशिरस येथे करण्यात आले.यादरम्यान मांडवे गावचे सरपंच मा.हनुमंत टेळे ,उपसरपंच कु. पंचशीला गायकवाड,ग्रामविकास अधिकारी मा. रविंद्र पवार, तलाठी मा.प्रवीण उदगावे ,पोलीस पाटील मा. नितीन सोनटक्के,कृषी सल्लागार मा. विजय निंबाळकर , इतर ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी वर्ग आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी महाविद्यालयातील कृषी मित्र सुरज शिरगिरे, अभिजीत शेलार, विराज शिंदे ,प्रशांत तनंगी, आदित्य हलकुडे ,अभिषेक वकारे, विशाल गायकवाड यांनी शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन केले.यामध्ये कृषी मित्रांनी शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन भरघोस उत्पादन, कीड व रोग नियंत्रण ,फळबागांचे निरोगी व्यवस्थापन व शेतमालांची विक्री, बाजारभाव आणि शेतीमध्ये तंत्रज्ञानाच्या भविष्यातील संधी आणि कृषी विषयक सल्ला इत्यादी विषयांचे मार्गदर्शन केले.

यावेळी सुधाकर कुलकर्णी, इस्माईल तांबोळी ,अरविंद वाघमोडे ,पांडुरंग पालवे, धनंजय दुधाळ, संदीप राऊत, दत्तात्रेय डोळस, ज्ञानेश्वर शिंदे ,लक्ष्मण साळुंखे ,निखिल गायकवाड, गुणवंत ढोबळे, नागेश वाघमोडे व गावातील इतर ग्रामस्थ उपस्थित होते.यासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील रत्नाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य आर. जी. नलावडे, कार्यक्रम समन्वयक प्रा.एस .एम. एकतपुरे, कार्यक्रम अधिकारी प्रा. एम. एम. चंदनकर ,प्रा.एच. व्ही. कल्याणी यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज