मांगी येथे पुन्हा एकदा बिबट्याने वासरू केले फस्त..


प्रतिनिधी (करमाळा ):-मांगी येथे काल रात्री बिबट्याने मांगी येथील विनोद बागल यांच्या गोठ्यात बांधलेल्या गाईच्या वासरा वरती हल्ला करून ठार केले. हा बिबट्या दररोज शेतकऱ्यांच्या गाई वासरांन वरती हल्ले करून ठार करत आहे.

गेल्या चार ऑगस्ट पासून आज 24 ऑगस्ट उजाडला तरी तब्बल वीस दिवस हा बिबट्या वन विभागाला चकवा देत असून हा बिबट्या दररोज पाळीव प्राण्यांवरती हल्ले करून त्यांना फस्त करत आहे.
गेल्या वीस दिवसात किमान दहा ते पंधरा शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांवरती हल्ले करून ठार केलेले आहे.
यामुळे मांगी पंचक्रोशीतील व दक्षिणवडगाव, उत्तर वडगाव, पोथरे ,कामोने जातेगाव, या शिवारामध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण असून शेतकरी जीव मोठी धरून शेतीची कामे करत आहेत. तसेच शेतात काम करण्यासाठी महिला मजूर घाबरत असून रात्री बाहेर पडायला सुद्धा लोक घाबरत आहेत.
यामुळे समस्त गावकऱ्यांकडून वनविभाग कर्मचाऱ्यांचा वरती संताप व्यक्त केला जात आहे.
वारंवार पिंजरे लावूनही बिबट्या वनविभागाच्या हाती लागत नसून तो दररोज आपली जागा बदलत असून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन,पाळीव जनावरांवरती हल्ले करत आहे.

या बिबट्याला लवकरात लवकर जेर बंद करा ही ग्रामस्थांकडून वारंवार मागणी होत आहे.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज