चाकोरे गावात राजकीय नेते मंडळीना गावबंदीचे ग्रामपंचायतीला निवेदन

प्रतिनिधी :-माळशिरस तालुक्यातील चाकोरे गावातील सकल मराठा समाज यांच्या वतीने मराठा समाजाला जोपर्यंत ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय नेते मंडळीना गावबंदीचे निवेदन चाकोरे ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामसेवक यांना देण्यात आले आहे.

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळण्यासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावातून मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला होता. पुढे ही सकल मराठा समाजाची मागणी संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलने चालू राहिली आहे.

आज चाकोरे येथील सकल मराठा समाज यांच्या वतीने चाकोरे ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांना निवेदन देण्यात आले आहे.त्या निवेदनामध्ये मागणी केली आहे की,जोपर्यंत मराठा समाजाला कायदेशीर ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत सर्व राजकीय नेते, आमदार,खासदार,मंत्री यांना गावबंदी व कोणतीही राजकीय सभा व कार्यक्रम घेण्यास बंदी करण्याचा ठराव सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आलेला आहे.तरी सर्व लोकप्रतिनिधी याची दक्षता घेऊन चाकोरे गावात व परिसरात येऊ नये अन्यथा सकल मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल याची दक्षता पोलीस प्रशासनाने घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज