एम एस ई बी(MSEB) अकलूज च्या विरोधात युवा सेनेच्या वतीने मशाल जागर आंदोलन 

प्रतिनिधी :- शिवसेना सचिव वरुण सरदेसाई, युवासेना विभागीय सचिव अक्षय ढोबळे, युवा सेना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख उत्तम आयवळे, युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना उपजिल्हा प्रमुख सोनू भैय्या पराडे पाटील, युवा सेना तालुका प्रमुख सुभाष काकडे ,युवा सेना उपतालुका प्रमुख दत्ता भाऊ साळुंखे, शिवसेना उपतालुका प्रमुख महादेव बंडगर यांच्या वतीने महावितरण कंपनी चे अधिकारी ओमाशे साहेब यांना देण्यात आले .

माळशिरस तालुक्यातील संगम गावातील महाडिक आणी वाघोली गावातील मिसाळ या शेतकऱ्यांचे ऊस महावितरण कंपनीच्या गलथन कारभारामुळे जळाले त्यामुळे महावितरण कंपनीचे अधिकारी यांनी झोपेचे सोंग घेतलेले होते त्यामुळे युवा सेनेच्या वतीने झोपलेल्या महावितरण कंपनीला जागे करण्यासाठी मशाल पेटवून जागर आंदोलन करण्यात आले.

दि 14 जुलै 2023 रोजी चे पत्र व्यवहार मध्ये युवा सेनेच्या वतीने महावितरण कंपनीकडे मागणी केलेली होती की सदर माळशिरस तालुक्यातील विधुत प्रवाहाचे वाकलेले खांब सरळ करणे लूज झालेल्या विधुत प्रवाहाच्या तारा तात्काळ ओढून घेणे आणी त्याला तात्काळ गार्डिंग बसवणे,  खराब झालेल्या डिपी चे केबल फियुज तात्काळ नवीन बसवणे ही आपणास मागणी केली होती परंतु आपण या युवासेनेच्या मागणीला केराची टोपली दाखवली होती . वाघोली व संगम गावातील शेतकऱ्याचा ऊस तारा लुज असल्या कारणानाने जळाला. त्या शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले त्यामुळे आपण झोपेच सोंग घेतले असल्या कारणाने आपल्या महावितरण कंपनीला जाग येण्यासाठी आम्ही युवा सेनेच्या वतीने आज मशाल पेटवून जागर आंदोलन केले आहे यापुढे जर आपण आमच्या मागण्या मान्य नाहीत केल्या तर युवा सेनेच्या वतीने आम्ही आपल्या कार्यालया समोर अमरण उपोषण करू असा इशारा युवा सेनेच्या वतीने देण्यात आला यावेळी युवा सेना अकलूज शहर प्रमुख शेखर खिलारे, बाभुळगावचे सरपंच भुषण भैय्या पराडे,जय पराडे,गोविंद मीटकल,अमीत पराडे,तुकाराम मसवले, अण्णा पराडे,कविराज पराडे,अविनाश पराडे,अनिल पराडे,तुषार राऊत ,भाऊ लेंगरे ,प्रवीण माने, सागर लोखंडे, अर्जुन लोखंडे, अजय गणेश काळे ,अण्णा पाटील, नितीन इंगळे, सागर इंगळे ,अक्षय पराडे ,विकास भोई,दया इंगळे, ओम पराडे, रोहीत इंगळे ,नवा इंगळे ,शंभुराजे पराडे ,प्रतीक इंगळे, युवराज पवार, सुनिल पवार ,संतोष साळुंखे, बंटी पवार, कीरण साळुंखे, नाना पवार ,करण पवार ई. युवासैनिक उपस्थित होते

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज