तुळजापूर शिंगणापूर रस्ता शेकडो वर्षापासुन कावड काट्या, तसेच लाखो भाविक ज्या मार्गाने पायी जातात तिथूनच झाला पाहिजे -भाजपा सरचिटणीस तथा पडसाळीचे सरपंच योगेश पाटील

modnimb प्रतिनिधी :-देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय रस्ते वाहतुकमंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातुन मागील ९ वर्षापासुन देश प्रगतीकडे वाटचालकरत आहे. राज्यातील सर्व प्रमुख पालखीमार्ग वारकर्र्यांच्या सेवेखातर चौपदरीकरण करण्यात आले. त्याच धर्तीवर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी तुळजापूर शिखर शिंगणापूर हा तीर्थक्षेत्र जोड रस्ता करण्यासाठी प्रयत्न चालु केले आहेत. त्यासाठी शिवसेना संपर्कप्रमुख संजय बाबा कोकाटे यांनीही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व खासदार राहुल शेवाळे यांचे समवेत केंद्रीय रस्ते वाहतुकमंत्री नितीन गडकरी साहेब यांची भेट घेतली. रस्ता मंजुरीसाठी हालचाली जोरात चालु झाल्या असताना मोडनिंब गावातील कार्यतत्पर स्वयंघोषीत नेत्यांनी रस्त्याला विरोध करण्याची जणु स्पर्धाच सुरू केली आहे.

पुढे बोलताना भाजपा सरचिटणीस तथा पडसाळीचे सरपंच योगेश पाटील म्हणाले की हा रस्ता २०२१ मध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मोडनिंब करकंब मार्गे जाण्यासाठी पत्र दिले होते, परंतु मोडनिंबच्या स्वयंघोषीत नेत्यांनी त्यासंबंधी कोणताही पाठपुरावा केला नाही किंवा तसे एखादे पत्र ही दिले नाही .नंतर योगायोगाने हा रस्ता सर्वेमध्ये पात्र झाला नाही नंतर आम्ही मागणी केल्यामुळे त्यांनी मुळ रस्ता म्हणजे कावडकाठी व लाखो भाविक ज्या मार्गावरून पायी जातात त्यारस्त्याच्या मंजुरीसाठी गडकरी साहेबांना पत्र दिले. परंतु लगेच मोडनिंबकरांना जाग आली जे मोडनिंब स्थानिक नेत्यांच्या उदासिनतेमुळे नकाशावरूनच संपले आहे. जे मोडनिंब नंबर एकची बाजारपेठ असताना आज ॲाक्सीजनवर आहे. रेल्वेचा भुयारी मार्ग करताना किती चुका केल्या. मोडनिॅब येथुन पुणे सोलापूर नॅशनल हायवे गेला आहे त्याचा फायदा मोडनिंबकरांना कसा होईल यासाठी प्रयत्न करावा. कित्येक लोक अपघातात मृत्यमुखी होत आहेत. एसटी महांमडाळाची बस मोडनिंबमध्ये उतरायला तयार नाही. एकही रस्ता चांगल्या प्रतीचा झाला नाही. मोडनिंब मार्केटमध्ये मिरची, कांदा यासह तरकारी मार्केट मोठ्या प्रमाणात होते. जनावरांचा बाजार दलालांमुळे बंद होण्याच्या अवस्थेकडे वाटचाल करत आहे. असे मोडनिंबच्या विकासासाठी कित्येक मुद्दे आहेत त्याविषयी आवाज उठवला नाही तर सर्व सामान्य मोडनिंबकर या स्वयंघोषीत नेत्यांना कदापी माफ करणार नाही. मोडनिंबचे भवितव्य घडवायचे असेल तर या प्रमुख मुद्यांसाठी रस्त्यावर उतरवण्याची गरज आहे. नको त्या गोष्टीच्या मागे पळण्यापेक्षा मोडनिंबचा पायभुत विकास करण्यासाठी राहिलेले प्रश्न सोडवण्यासाठी भाजप महायुतीच सरकार आपल्यासोबत आहे, आम्ही आपल्या सोबत आहोत. भाजप शिवसेना महायुतीच्या सरकारच्या माध्यमातुन संजय बाबा कोकाटे यांनी एमआयडीसी मंजुर करून आणली आहे ती कशी लवकरात लवकर चालु होईल याकडे लक्ष द्यावे. मोडनिंब गावातून दोन नॅशनल हायवे गेले आहेत. मोडनिंबला सध्या नविन हायवेची गरज नाही मुलभूत प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याची स्थानिक नेत्यांना गरज आहे.

सध्या रस्ता ज्या मार्गावरून जाणार आहे ती गावे मोडनिंबच्या शेजारीच आहेत त्या गावातील मतदारही लोकप्रतिनिधी निवडुन देण्यासाठी मतदान करतात. माढा, चिंचोली, भुताष्टे, पडसाळी, वरवडे, परिते, बेंबळे मार्गे जाणे गरजेचे आहे. माढा तालुक्यातील जो भाग मागास आहे, तो रस्त्यावर आणुन सर्वांगीण विकास झाला पाहिजे. यासाठी वेळ पडली तर आसपासच्या खेड्यातील माढ्यापासुन बेंबळ्या पर्यंतच्या सर्वपक्षीय जनतेला सोबत घेऊन जन आंदोलन उभे करावे लागले तरी चालेल पण रस्त्याचा मार्ग आम्ही बदलु देणार नाही. आम्हाला आमच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे. रस्ता झाला तर आम्ही सांगितलेल्या मार्गावरूनच होईल अन्यथा होणार नाही. ज्या गोष्टी मोडनिंबच्या विकासासाठी महत्वाच्या आहेत त्या गोष्टीवर लक्ष केंद्रीत करा विनाकारण मोडनिंबच्या सामान्य जनतेला वेठीस धरू नका. हा सगळा अट्टाहास बिनकामाचा आहे. यातून काहीच हाती येणार नाही असेही यावेळी भाजपा सरचिटणीस तथा पडसाळी गावचे सरपंच योगेश पाटील यांनी सांगितले

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज