मोरोची येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित रत्नाई कृषी महाविद्यालयातर्फे पिकाचे पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन तसेच केळी पिकातील अतंर मशागत या संदर्भात मार्गदर्शन

प्रतिनिधी :-मोरोची येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित रत्नाई कृषी महाविद्यालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या शेतकऱ्यांसाठी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम 2023-24 अंतर्गत कृषी सल्ला केंद्राने शेतकर्यांना केळी पिकाबद्दल मार्गदर्शन केले . केळी पिकाचे पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन तसेच केळी पिकातील अतंर मशागत या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.

कृषीदुत आकाश अडसूळ, उदयराज गोडसे, अक्षय गोळे, ऋषीकेश वाघमारे,आदित्य जाधव सौरभ लोखंडे, ओंकार शिंदे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. प्रात्यक्षिकाच्या आयोजनासाठी शिक्षण प्रसारक मंडळ अकलुज संचलित रत्नाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य आर जी नलावडे, कार्यक्रम समन्वयक प्राध्यापक एस एम एकतपुरे, कार्यक्रम अधिकारी प्रा एम. एम. चंदनकर प्रा. एच. व्ही. कल्याणी आणि प्राध्यापिका एस एल मसकर (उद्यानविद्या विभाग) यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज