डॉ.विश्वनाथ आवड यांचा इनरव्हिल क्लबच्या वतीने नेशन बिल्डर अँवार्डने सन्मान

अकलूज दि.३० (प्रतिनिधी):
इनरव्हिल क्लब सोलापूर व अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिनाचे निमीत्ताने नेशन बिल्डर या सन्मान सोहळ्याचे आयोजन केले होते.हा सन्मान सोहळास सौ.सत्यप्रभादेवी रणजितसिंह मोहिते पाटील व सिने अभिनेते मिलींद गुणाजी यांचे हस्ते पार पडला.
डॉ.प्रा.विश्वनाथ आवड यांनी केलेल्या शैक्षणिक, सामाजिक,सांस्कृतिक कार्याची दखल घेवून इनरव्हिल या सामाजिक संघटनेच्या वतीने त्यांना सन्मानीत करण्यात आले.या सन्मान सोहळ्याप्रसंगी सोलापुर जिल्हा व माळशिरस तालुक्यातील विविध क्षेत्रात काम करणा-या 20 व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.

                        या कार्यक्रमाचे आयोजन डॉ.श्रध्दा जवंजाळ व इनरव्हिलचे सर्व सदस्य यांनी केलेले होते.या सन्मान सोहळा प्रसंगी डिस्ट्रिक्ट प्रमुख शुक्ला मँडम,डॉ.देवडीकर,डॉ.गवळी,डाॅ.सिद,डॉ.कांबळे यांचे सह सर्व सन्मानार्थी उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इनरव्हिलच्या सर्व सदस्य व सहारा इस्टीट्यूटचे सहकारी यांनी प्रयत्न केले.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज