अखिल भारतीय ग्राहक पंचायत अकलूज शहर यांच्या वतीने दि.२४ डिसेंबर “राष्ट्रीय ग्राहक दिन” साजरा

प्रतिनिधी :-दिनांक २४ डिसेंबर हा दिवस “राष्ट्रीय ग्राहक दिन” म्हणून साजरा केला जातो. २४ डिसेंबर, १९८६ रोजी ग्राहक संरक्षण कायदा पास झाला, तेव्हापासून संपूर्ण भारतभर शासकीय, निमशासकीय पातळीवर, शैक्षणिक संस्था व ग्राहक चळवळ संबंधित संस्था राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करतात.

     भारतीय ग्राहक चळवळीचे प्रणेते, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी व ग्राहक कल्याण उच्चाधिकार समितीचे भूतपूर्व मंत्रिस्तरीय अध्यक्ष ग्राहकतीर्थ स्व. बिंदुमाधव जोशी यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शक तत्त्वांवर कार्यरत असलेली “ग्राहक पंचायत महाराष्ट्र” ही संस्था ग्राहक जागृतीचे पवित्र कार्य करीत आहे. मागील बारा वर्षात महाराष्ट्रातील अनेक जिल्हे व तालुक्यांमध्ये विस्तारलेली ही चळवळ निरलस, निरपेक्ष व समाजशरण वृत्तीने कार्यरत असणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांनी आपल्या खांद्यावर उचलून धरली आहे. ग्राहक संघटन, ग्राहक प्रबोधन, ग्राहकांच्या अडचणीवर मार्गदर्शन आणि प्रशासनाला सहकार्य करीत शोषणमुक्त समाज निर्मितीसाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे कार्यकर्ते विभाग, जिल्हा आणि तालुका पातळीवर कार्य करीत आहेत. संवाद समन्वयात ग्राहक कल्याण आणि प्रशासनाचा सहकारी म्हणून संस्था कार्य करीत आहे. आज अकलूज येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्या वतीने अतिशय उत्साहात ग्राहक दिन साजरा करण्यात आला. अकलूज येथील बस स्थानक, वैद्यकीय उपजिल्हा रुग्णालय,अकलूज तसेच वीज महावितरणच्या कार्यालयात ग्राहक दिनानिमित्त शुभेच्छा फलक लावून साजरा कला गेला. यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत अकलूज शहर अध्यक्ष मा.श्री. लालासाहेब अडगळे, माळशिरस तालूका संघटक मा. अमितजी पुंज, शैलेश दिवटे, नागेश पोटे इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज