अकलूज येथे राष्ट्रीय मानवाधिकार दिन रक्तदान शिबिराचे आयोजन करून साजरा केला

अकलूज दि.१४ (प्रतिनिधी)अकलूज येथे सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघांच्या वतीने राष्ट्रीय मानवाधिकार दिन विविध उपक्रमाणे साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाचे औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ व सोनार सामज महामंडळ महाराष्ट्र राज्य एचडीएफसी बॅक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित केले होते व दिडशे लोकांना अन्नदान करण्यात आले.

प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते भारत मातेच्या फोटो पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या प्रसंगी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लोकांची दखल घेऊन सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाच्या वतीने महिला होमगार्ड व पुरुष होमगार्ड यांना ही सन्मानपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले.अकलूजच्या नवीन एस टी स्टॅण्डवर महिला वर्गासाठी लिनेस क्लबच्या वतीने गर्भवती माता व स्तनपान माता यांच्यासाठी सुरक्षित बसण्यासाठी हिरकणी कक्ष उपलब्ध करून दिला,भटक्या जनावरांसाठी पाणी पिण्यासाठी टाकी बसविण्यात आल्या आहेत,ऊसतोड महिला व पुरूष मजूरांसाठी स्वेटर,साड्या व कपड्यांचे वाटप,मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला आहे तसेच रक्तदान शिबिरात महिला वर्ग सहभागी होऊन रक्तदान करतात या कार्याची दखल घेऊन सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाच्या वतीने लिनेस क्लब अकलूजच्या अध्यक्षा सौ.छाया बोराडे,उपाध्यक्ष सौ.संगिता दोशी,सचिव सौ. राजश्री जगताप,कमेटी मेंबर सौ.सोनल शहा,सौ.संध्या जाधव यांचाही सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच यावेळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या रक्तदान शिबीरात ५९ लोकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणेअकलूजचे माजी सरपंच किशोरसिंह माने पाटील, पश्चिम भारत अध्यक्ष अमोल बाळासाहेब माने,पांचाळ सोनार सामज महामंडळ पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महेश भास्करे, एचडीएफसी बँकेचे प्रशांत कुलकर्णी होमगार्डचे प्रमुख सुनील सुळे,पत्रकार शशिकांत कडबाने,गणेश जाधव,संजय लोहकरे,नौशाद मुलाणी व सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघचे सदस्य माळशिरस तालुका अध्यक्ष तानाजी वायदंडे,उपाध्यक्ष विष्णू केंगार,पुणे जिल्हा महिला अध्यक्ष शुभांगी मोरे,माळशिरस तालुका महिला अध्यक्ष अश्विनी पांढरे, माळशिरस तालुका महिला सरचिटणीस वंदना तिकोटे,माढा तालुका महिला अध्यक्ष वनिता वांजळे,रोहित टेके,रामदास धाईजे आदी मान्यवर उपस्थित होते .

हा कार्यक्रम सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश कुंभारे व राष्ट्रीय उपाध्यक्ष तेजस परमार पश्चिम भारत अध्यक्ष अमोल माने यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या करण्यात आला.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज