राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सांस्कृतिक विभागाच्या राज्यप्रमुखपदी राधिका देवदत्त हंकारे

अकलूज ता.२७: महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सांस्कृतिक विभागाच्या राज्यप्रमुखपदी राधिका देवदत्त हंकारे यांची नियुक्ती करण्यात आली.

         महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंतराव पाटील यांनी सांस्कृतिक विभागाच्या राज्यप्रमुखपदी राधिका देवदत्त हंकारे यांची निवडीचे पत्र दिले. यावेळी आमदार सुनील भुसारा, कार्याध्यक्ष मुंबई राष्ट्रवादी महिला काँग्रेस सुरयना मल्होत्रा, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस सरचिटणीस मोहित गायकवाड यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

         राष्ट्रीय अध्यक्ष खा. श्री. शरद पवार यांचे विचार सर्वदूर पोहोचविण्यासाठी तसेच समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन पक्षाची ध्येय धोरणे राबवित पक्ष मजबूत करण्यासाठी योगदान देणार असल्याचे मत राधिका हंकारे यांनी व्यक्त केले.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज