राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय लढ्यात खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार – अर्चना शेळके पाटील 

अकलूज प्रतिनिधी: माळशिरस तालुक्यातील तमाम महिलांचा आवाज आणि महिलांच्या अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध आवाज उठविणाऱ्या कार्यकर्त्या सौ.अर्चना तेजस शेळके-पाटील यांनी महिलांसाठी केलेले काम व शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ध्येय धोरणे व विचार तळागाळातील महिला पर्यंत पोहचविण्याचे प्रामाणिकपणे काम करीत असल्याने शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.जयंतराव पाटील यांनी सौ.अर्चना तेजस शेळके-पाटील यांची माळशिरस तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या अध्यक्ष पदी नियुक्ती केली. त्यावेळी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेबुब शेख, सोलापूर जिल्हा अध्यक्ष बळीराम काका साठे , पक्ष निरीक्षक शेखर माने,प्रदेश सरचिटणीस शंकर नाना देशमुख, अभिजीत आबा पाटील,तालुका अध्यक्ष माणिक बापू वाघमोडे, कार्याध्यक्ष उदय आबा देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब धाईंजे, अब्दुल शिकलकर, मोनिका भगत,सयाजी गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. माळशिरस तालुक्यातील महिला बचत गट तसेच सुशिक्षित बेकार शेत मजूर महिला यांच्या साठी आवाज उठीवणार तसेच बेरोजगारी महागाई, गॅस सिलेंडर च्या दरात मोठ्या प्रमाणत झालेली वाढ तसेच केंद्र सरकार या सर्वा पासून दुर्लक्ष करीत असून बहुजनांच्या लेकरांना ज्ञान मंदिराकडे जाणे ऐवजी मंदिराकडे पाठविण्याचे षडयंत्र चालू असल्याने ते मी महिलांचे सहकार्याने हाणून पडणार तसेच पक्षाच्या सामाजिक राजकीय लढ्यात संसद रत्न सुप्रिया ताई सुळे यांच्या पाठीशी खंबीरपणे माळशिरस तालुक्यातील महिला सहित प्रामाणिकप्रणाने उभी राहणार असल्याचे त्यांनी सत्करास उत्तर देताना सांगितले.

संसद रत्न सुप्रिया सुळे, सोलापूर जिल्हा महिला अध्यक्ष सौ. सुवर्णा शिवपुजे, माळशिरस तालुका राष्ट्रवादी कार्याध्यक्ष उदय आबा देशमुख, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस मोहित गायकवाड यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज