स्त्रीच्या जीवनात आत्मविश्वास हाच खरा दागिना-शितल देवी मोहिते पाटील

प्रतिनिधी :-अकलूज येथे शिवरत्न फाउंडेशन व डॉटर्स मॉम फाउंडेशन आयोजित नवरात्री निमित्त दांडिया गरबा स्पर्धेच्या वेळी त्या बोलत होत्या. 

सालाबादप्रमाणे दि.९ ऑक्टोबर ते २२ ऑक्टोबर या कालावधीमध्ये सर्व वयोगटातील महिला व मुलींसाठी दांडिया रास गरबा वर्कशॉप व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते.

याकार्यक्रमामध्ये आदिमाया आदिशक्ती श्री दुर्गा देवीचे पूजन व आरती राजइंदिरा मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी कुमारीकांचे पूजन करून त्यांना शालेय उपयोगी वस्तूचे वाटप करण्यात आले.

या स्पर्धेच्या प्रसंगी बोलताना डॉटर्स मॉम फाउंडेशनचे अध्यक्ष शितल देवी मोहिते पाटील पुढे म्हणाल्या की,आजची स्त्री दैनंदिन जीवनात अगदी सहजतेने विविध भूमिका पार पाडत आहे.ती समाजाच्या आधारस्तंभ बनली आहे.आज देशाच्या प्रगतीसाठी अनेक क्षेत्रात मोठे स्त्रीने योगदान दिले आहे.राजामाता जिजाऊ,राणी लक्षीबाई,सावित्रीबाई फुले, कल्पना चावला सिंधुताई सपकाळ यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक अडचणींना सामना करत समजा व देश प्रगतीसाठी मोलाचे योगदान दिले आहे. आजची आधुनिक दुर्गा ही सर्व क्षेत्रात आत्मविश्वास पूर्ण काम करत आहे.हे करीत असताना नोकरी, व्यवसाय,मुले,कुटुंब या सर्व जबाबदाऱ्या सक्षमपणे हाताळत आहे.यासर्व जबाबदारी पुर्ण करण्यासाठी महिलांनी शारीरिक मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या मजबूत असणे खूप आवश्यक आहे .  

क्षस्त्री शक्तीचा जागर करण्यासाठी शिवरत्न फाउंडेशन व डॉटर्स मॉम फाउंडेशन गेली अनेक वर्ष लेक वाचवा लेक शिकवा अंतर्गत महिला सक्षमीकरणासाठी मुली व महिलांसाठी अनेक प्रकारचे उपयुक्त समाज उपयोगी कार्यक्रम व स्पर्धाचे आयोजन करत असते या सर्व स्पर्धांमध्ये महिलांचा उत्साह पूर्ण सहभाग बघून सर्व महिलांचे त्यांनी मनापासून अभिनंदन केले व आभार मानले.या स्पर्धेमध्ये रेग्युलर बॅच साठी बेस्ट डान्स म्हणून समृद्धी गिरमे हिला विशेष प्राविण्याचे बक्षीस देण्यात आले. .

बेस्ट ड्रेसिंग व बेस्ट डान्सचे बक्षीस अमिषा पटेल तर द बेस्ट मधील बक्षीस सौ दीपा राऊत यांनी मिळविले .ऑन द स्पॉट मधील बक्षिसे बेस्ट डान्स श्रेया गुळवे,बेस्ट ड्रेसिंग डान्स सायली मगर व द बेस्ट विजयालक्ष्मी गुळवे यांना मिळाले.यावेळी उपस्थित कार्यक्रमांमधील सर्व महिलांचे अभिनंदन सौ.शितलदेवी मोहिते पाटील यांनी केले .

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज