निंभोरे येथे मोफत मोतीबिंदू शिबीर संपन्न

प्रतिनिधी :-करमाळा तालुक्यातील निंभोरे येथे आर.व्ही.ग्रुप, निंभोरे  यांचे वतीने मोफत मोतीबिंदू निदान व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.नेत्र तपासणी साठी पुणे येथील सुप्रसिद्ध  बुधराणी हॉस्पिटल चे मेडिकल फिल्ड एक्सेकेटिव संजय कोळेकर आणि संतोष सर यांनी काम पाहिले.

या शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले.गावातील ज्येष्ठ मंडळींच्या हस्ते श्रीफळ वाढवून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.सामाजिक कार्यकर्ते रविदादा वळेकर यांचे मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आर.व्ही.ग्रुप चे अध्यक्ष पप्पू मस्के,संस्थापक प्रवीण वळेकर,ग्रुप चे सचिव दत्ताभाऊ वळेकर,सदस्य नाथाभाऊ शिंदे,राज पठाण,लक्ष्मण वळेकर,गणेश वळेकर आदी सहकाऱ्यांनी हे शिबिर यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.

निंभोरे गाव आणि पंच कृषितील २५५ लोकांची मोफत तपासणी करण्यात आली. यामध्ये ३५ जण पुढील आठवड्यात पुणे येथील सुप्रसिद्ध बुधरणी हॉस्पिटल येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी घेऊन जाणार असल्याचे रविदादा वळेकर यांनी सांगितले.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज