पडसाळी ता. माढा येथे गण स्तरीय प्रशिक्षण शिबीर उत्साही वातावरनात संपन्न

 प्रतिनिधी :-पडसाळी (तालुका माढा ) येथे ग्रामपंचायत पडसाळी व पंचायत समिती कुर्डूवाडी यांचे संयुक्त विद्यमाने 2 दिवसीय शिबीर संपन्न झाले. महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेची पूजा करून शिबिराला सुरुवात करण्यात आली. या शिबिरात भुताष्टे पंचायत समिती गणातील विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक, अंगणवाडी सेविका तसेच ग्रामसेवक उपस्थित होते. या शिबिरासाठी प्रशिक्षक म्हणून यशदा संस्थेचे ट्रेनर कादे साहेब तसेच कर्तव्यदक्ष विस्तार अधिकारी मराठे साहेब, अटल भूजल योजनेच्या कृतिका बंडगर मॅडम उपस्थित होते. 

या प्रशिक्षण शिबिरात जीपीडीपी आराखडा कसा बनवणे बनवायचा त्याचबरोबर ग्रामपंचायत सरपंच यांनी काय काम केले पाहिजे तसेच ग्रामपंचायत सदस्य यांनी काय काम केले पाहिजे या संदर्भात खूप असं मोलाच मार्गदर्शन कादे साहेब यांनी केल. त्याचबरोबर अटल भूजल योजनेच्या माध्यमातून पडसाळी गावात नवीन टीम तयार करून सरपंच योगेश पाटील यांनी काम करावे व गावाची पाण्याची पातळी जी खालावली आहे ती सुधारण्यासाठी अटल भूजल योजना हे एक प्रभावी माध्यम आहे तरी पडसाळी गावातील नागरिकांनी या योजनेत सहभागी होऊन 80 टक्के अनुदानावर ड्रीप असेल किंवा अशा अनेक लाभाच्या योजना राबवून कमीत कमी पाण्यावर शेती कशी करता येईल यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावे अशी विनंती ट्रेनर कादे साहेब यांनी केली. विस्तार अधिकारी मराठे साहेब यांनी ग्रामपंचायतीशी निगडीत विविध विषयावर मार्गदर्शन केले. त्याचबरोबर सरपंच योगेश पाटील, भेंडचे माजी सरपंच डॉ. संतोष दळवी यांनीही मार्गदर्शन केले.

यावेळी भेंडच्या सरपंच डॉ. मनीषा दळवी, जाधववाडीचे सरपंच राहुल जाधव चिंचोलीचे सरपंच संतोष लोंढे, सोलंकरवाडीचे सरपंच बाबासाहेब पांढरे, भुताष्टेचे उपसरपंच बंडू व्यवहारे, पडसाळीच्या नूतन उपसरपंच साधना चंद्रकांत देशमुख, ग्रामपंचायत सदस्य आण्णासाहेब मुटकुळे, भेंडचे उपसरपंच प्रवीण गायकवाड यांच्यासह ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत ग्रामसेवक रूपाली सुर्वे मॅडम यांनी केले. प्रशिक्षणासाठी आलेल्या सर्वांसाठी ग्रामपंचायत पडसाळीच्या वतीने उत्तम अशी भोजनाची व्यवस्था केली होती.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज