पडवी येथील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन

प्रतिनिधी : पडवी येथील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन २०२३-२०२४ आयोजित करण्यात आले होते. ह्यात शाळेतील विद्यार्थी यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम शाळेच्या प्रांगणात संपन्न झाले. ह्या विध्यार्थींना प्रोत्साहन देण्यासाठी कौतुकाची थाप पाठीवर पडावी ह्या करीता विध्यार्थी पालक, शाळेतील मुख्यधापक, सर्व शिक्षक वृंद, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य व शाळा व्यवस्थापन समिती, सरपंच, उपसरपंच अदी मान्यवर ह्या सोहळ्यास उपस्थित होते.

मुलांचे कबड्डी सह विविध खेळाचे प्रकार ठेवण्यात आले होते. नाच गाणी देखील झाले. शाळेचे मुख्याध्यापक कोलपे सर व ईतर सह शिक्षक यांनी खूप मेहनत घेतली, मागील वर्षी माजी विद्यार्थी यांच्या योगदानातून शाळेचे नूतनीकरण देखील करण्यात आले होते. राकेश तांदलेकर, विशाल साळूंके, राजू साळूंके, अंकूश साळूंके, स्वप्नील साळूंके, वैभव साळूंके, किशोर साळूंके व चंद्रकांत साळूंके जे.जे.रूग्णालय मूंबई यांच्या प्रयत्नाने शाळेचे रूप पालटले. ह्यामुळे कार्यक्रमाची शोभा वाढली. मूलांनी सादर केलेली गाणी व विविध खेळ पाहताना आनंद झाला. हा नेञदिपक सोहळा गावकर्‍यांना खूप आवडला ह्यात महिला मंडळ पडवी यांचा सहभाग खूप मोलाचा होता. सुंदर व अविस्मरणीय कार्यक्रम असा झाला. अशी सदरची माहिती श्री. चंद्रकांत दादा साळूंके ह्यांनी दिली.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज