फलटण ते पंढरपूर रेल्वेमार्गाला मंजुरी – माजी उमुख्यमंत्री विजसिंहजी मोहिते – पाटील यांच्या प्रयत्नांना यश

मुंबई :  फलटण ते पंढरपूर हा १०५ किमीचा रेल्वेमार्ग आता रेल्वे मंत्रालयामार्फत पूर्ण करण्यात येणार आहे असे राज्य सरकारने आज मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर केले आहे.

राज्याच्या ग्रामीण भागातील रेल्वे प्रकल्पांना गती देऊन जलद गतीने पुर्ण व्हावे याकरीता अशा निवडक प्रकल्पांमध्ये आर्थिक भागीदारी देण्याचे धोरण राज्य शासनाने स्वीकारले आहे.पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी येणारे वारकरी, शेतकरी, व्यापारी व सर्वसामन्य लोकांना याचा फायदा होणार आहे.

माजी उमुख्यमंत्री विजयसिंहजी मोहिते पाटील व आमदार रणजितसिंहजी मोहिते पाटील यासाठी सातत्याने पाठपुरावा करत होते. त्यांनी तत्कालीन रेल्वे मंत्री पीयुष गोयल यांची भेट घेऊन हा विषय मार्गी लावण्यासाठी पत्र देऊन मागणी केली होती. तत्कालीन मंत्री मा.सुरेश प्रभू यांनी देखील याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला होता.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज