लावणी सम्राज्ञी वैशाली वाफळेकर यांचा अकलूज पत्रकार मित्र परीवाराच्या वतीने सत्कार

अकलूज प्रतिनिधी:कै.पठ्ठे बापूराव प्रतिष्ठान व सांस्कृतिक कला मंडळाच्यावतीने लोककलावंताना दिला जाणाऱ्या मानाचा “पवळा” पुरस्कार मिळाल्याबद्दृल लावणी सम्राज्ञी वैशाली वाफळेकर यांचा अकलूज पत्रकार मित्र परीवाराच्या वतीने सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या.

नुकताच कै.पठ्ठे बापूराव प्रतिष्ठान व सांस्कृतिक कला मंडळाच्यावतीने बालगंधर्व रंगमंदिर येथे माजी राज्यपाल व खासदार श्रीनिवास पाटील व आमदार रवींद्र धंगेकर यांच्या हस्ते तमाशा क्षेत्रातील लोक कलावंतांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी “पवळा” या मानाचा पुरस्कार देवुन सुप्रसिद्ध लावणी नृत्यांगना वैशाली वाफळेकर यांना गौरवण्यात आले आहे.वाफळेकर यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल अकलूज पत्रकार मित्र परिवाराच्यावतीने चंद्रकांत कुंभार,भारत मगर,श्रीनिवास कदम पाटील,लक्ष्मीकांत कुरुडकर,शिवाजी पालवे,सागर खरात व नागेश लोंढे यांनी त्यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.

लावणी नृत्यांगना वैशाली वाफळेकर यांनी अकलूज येथील सहकार महर्षी जयंती समारंभ समितीच्या वतीने घेतलेल्या लावणी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला होता.या पत्रकार मित्र परिवाराच्या सत्कार समारंभप्रसंगी आपली लहानपणीची व्यथा मांडताना म्हणाल्या की,मी स्कॉलरशिपची हुशार विद्यार्थिनी पण,परिस्थितीमुळे पुढचे शिक्षण घेऊ शकले नाही.माझ्यासारखे असे अनेक लोक कलावंताची मुले आहेत.पण गरीब परिस्थितीमुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च परवडत नाही आहे.त्यासाठी सरकारने लोककला क्षेत्रातील कलाकारांसाठी स्वतंत्र धोरण आखावे,आशी व्यथा लावणी नृत्यांगना वैशाली वाफळेकर यांनी व्यक्त केले.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज