अकलूज मधील वाहन चालकानो सावधान वाहन चालवत मोबाईलवर बोलणे पडणार महागात  

प्रतिनिधी (अकलूज ):-वाहन चालवत असताना मोबाईल फोनचा वापर बरेच लोक करत असल्याने त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. अपघातास प्रतिबंध करण्याकरीता लोकांचे जिवीताची व वाहन चालकाची सुरक्षीतता अबाधीत राखण्यासाठी वाहन चालकाविरुध्द कारवाई करण्याची मोहिम अकलुज पोलीसांनी सुरु केली आहे. दिनांक 08/12/2023 रोजी अकलुज षहर हद्दीत वाहन चालविताना वाहन चालक मोबाईल बोलत असताना मिळून आल्याने भारतीय दंड सहिंता कायदा कलम 336 प्रमाणे 17 वाहन चालकाविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. याषिवाय बिगरनंबरचे वाहन चालविणे, भरधाव वेगाने वाहन चालविणे, विनासिटबेल्टचा वापर करणे, ट्रिपलषिट, वाहनांचे सायलन्सर वाजवणे तसेच मोटार वाहन कायदयाचे उल्लंघन करणारे वाहन चालकांविरुध्द चालू वर्शात मोटार वाहन कायदयाखाली 3,940 केसेस करुन एकुण 25,49,200/- रुपये दंड करण्यात आलेला आहे. 

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, षिरीश सरदेषपांडे, अपर पोलीस अधीक्षक, प्रितम यावलकर सोलापूर ग्रामीण, डाॅ. सई भोरे-पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, अकलुज विभाग, अकलुज, दिपरतन गायकवाड, पोलीस निरीक्षक, अकलुज पोलीस ठाणे यांचे मार्गदर्षनाखाली सहा. पोलीस निरीक्षक गणेष चैधरी, सहा. पोलीस फौजदार बाळासाहेब पानसरे, पोलीस अंमलदार विषाल घाटगे, विक्रम घाटगे, संजय खैरे, प्रविण हिंगणगांवकर, सोमा माने व वाहतुक षाखेचे पोलीस अंमलदार हनुमंत झिंजे, इन्नूस आतार, षब्बीर नदाफ यांनी कारवाई केलेली आहे.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज