पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने विविध मागण्यांसाठी हलगीनादसह बोंबाबोंब आंदोलन

प्रतिनिधी:-राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्रजी कवडे सर ,राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप भाई कवाडे व राज्य उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने विविध मागण्यांसाठी युवक महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या नेतृत्वात अकलूजच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर हलगीनादसह आंदोलन करण्यात आले.

26 जानेवारी रोजी या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आंदोलनाच्या मागण्यांमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून नवजात शिशु व बाल रुग्णांवर मोफत उपचार करण्यासाठी अकलूज मधील राणे नर्सिंग होम या हॉस्पिटलला त्वरित मान्यता देऊन माळशिरस, माढा, इंदापूर व सांगोला या चार तालुक्यातील गोरगरीब जनतेची होणारी गैरसोय दूर करून गोरगरिबांचा आर्थिक व मानसिक त्रास दूर करावा.वरिष्ठ स्तरीय चौकशी मान्य नसल्याने वैद्यकीय अधीक्षक माळशिरस यांच्या लेखी अहवालानुसारच अकलूज क्रिटिकल केअर अँड ट्रॉमा सेंटर या हॉस्पिटलवर त्वरित कारवाई करावी.अकलूज नगरपरिषद अंतर्गत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेतून कदम हॉस्पिटल ते जुना सांगोला रोड आंबेडकरनगर बॅकवर्ड हाऊसिंग सोसायटी अंतर्गत बनविण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाच्या काँक्रीट रस्त्याची राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन करून सखोल तपासणी करून कंत्राटदार प्रीतम एकतपुरे यांचा काळ्या यादीत समावेश करून सदरचा निकृष्ट दर्जाचा रस्ता त्वरित नव्याने तयार करून द्यावा.अकलूज मधील भटक्या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा.पाच तास विद्युत पुरवठा बंद ठेवून नागरिकांना मानसिक त्रास देणाऱ्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करून त्यांचेवर कडक कायदेशीर कारवाई करावी. जुना पंढरपूर नाका प्रतापसिंह चौक ते ब्लड बँक येथील गटर अकलूज नगरपरिषदेने JCB च्या साह्याने बरेच दिवसापासून उकरून ठेवली आहे त्यामुळे येथील नागरिकांना याचा खूप त्रास होत असल्याने सदरची गटार त्वरित नव्याने बांधून मिळावी. अशोका चौक ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक हा रस्ता खराब झाल्याने त्वरित नव्याने डांबरीकरण करून घ्यावा.अकलूज नगरपरिषद अंतर्गत खराब झालेले रस्ते गटारी त्वरित नव्याने बांधून मिळावेत.गणेशनगर कमान टाटा मोटर्स जिल्हा परिषद शाळा अशा चार ठिकाणी स्पीड ब्रेकर बसून मिळावेत.अकलूज तलाठी कार्यालय ते महावीर स्तंभ हा रस्ता त्वरित नव्याने डांबरीकरण करून मिळावा.अकलूज मधील नीरा नदीकाठी व नदीपात्रात अकलूज नगरपरिषदेने जमा केलेला कचरा त्वरित उचलून नीरा नदीचे पात्र स्वच्छ करावे.अकलूज मधील सोजर केबल नेटवर्कद्वारे नागरिकांची होणारी पिळवणूक व फसवणूक थांबवून सोजर केबल नेटवर्कवर कडक कायदेशीर दंडात्मक कारवाई करून नागरिकांना चांगली सेवा द्यावी.शिवतेजनगर प्रवेशद्वार ते शिवतेजनगर टाऊनशिप हा प्रमुख रस्ता व अंडरग्राउंड गटर व शिवतेजनगर टाऊनशिप मधील रस्ते व गटर त्वरित बांधून मिळावेत सदरच्या या मागण्यांचे निवेदन अकलूजचे उपविभागीय अधिकारी टिळेकर यांना देऊन सदर निवेदनावर त्वरित कारवाई न झाल्यास आझाद मैदान मुंबई या ठिकाणी पुढील आंदोलन करणार असल्याचा इशारा महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी दिला.

यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पुणे जिल्हा युवक प्रवक्ता ऋषिकेश दळवी, माळशिरस तालुका अध्यक्ष हेमंत कांबळे, पंढरपूर तालुकाध्यक्ष सचिन जाधव ,पंढरपूर तालुका संपर्कप्रमुख सावता नवगिरे, माळशिरस तालुका युवक अध्यक्ष सचिन मोरे, अकलूज शहर अध्यक्ष शिवाजी खडतरे, तालुका उपाध्यक्ष सदानंद बनसोडे ,तालुका संघटक पांडुरंग चव्हाण, तालुका सरचिटणीस दयानंद कांबळे, तालुका खजिनदार विश्वास उगाडे, तालुका युवक कार्याध्यक्ष शिवम गायकवाड, शहर उपाध्यक्ष साजिद बागवान, शहर कार्याध्यक्ष शहाजी खडतरे ,शहर उपाध्यक्ष अविनाश गायकवाड, तालुका संपर्कप्रमुख रोहिदास तोरणे, बाबासाहेब ननवरे, आकाश गायकवाड ,राहुल वाघमारे, महिला आघाडी अध्यक्ष जयश्री गायकवाड ,अक्षय जाधव, राहुल चौगुले, वल्लभ माने, लखन बेंद्रे ,विनोद सावंत ,सुरेश अंभोरे, सौ. सविता खरे, फुलाबाई कोळी ,अभिषेक शिंदे ,लता खंडाईत यांचेसह मोठ्या संख्येने भिमसैनिक उपस्थित होते.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज