अकलूज नगरपरिषद कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्याची पीपल्स रिपब्लिकन पार्टीची मागणी

अकलूज प्रतिनिधी:- आशिया खंडातील पूर्वीची एक नंबरची ग्रामपंचायत म्हणून ओळख असणारी व सध्या नव्याने अस्तित्वात आलेल्या अकलूज नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना अकलूज नगरपरिषद अस्तित्वात आल्यापासून गेली दोन वर्षापासून दिवाळी बोनस दिला जात नाही. महाराष्ट्रातील इतर नगरपरिषदांमधील कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस दिला जातो परंतु अकलूज नगरपरिषदेतील कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस दिला जात नाही अकलूज नगरपरिषदेमधील बरेच कर्मचारी हे गरीब मागासवर्गीय आहेत काम केल्यावरच त्यांना खायला मिळते अशी परिस्थिती आहे त्यामुळे सदरच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस दिला तरच ते दिवाळी साजरी करू शकतात.महाराष्ट्रातील इतर नगरपरिषदांप्रमाणे अकलूज नगरपरिषदेतील कर्मचाऱ्यांनासुद्धा दिवाळी बोनस देऊन त्यांची दिवाळी गोड करावी या मागणीचे लेखी निवेदन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी अकलूज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांचेकडे केली आहे.

यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे माळशिरस तालुका संघटक राजू बागवान,तालुका संपर्कप्रमुख रोहिदास तोरणे,युवक तालुकाध्यक्ष सचिन मोरे,युवक तालुका कार्याध्यक्ष शिवम गायकवाड,युवक तालुका संघटक कबीर मुलानी,अकलूज शहराध्यक्ष शिवाजी खडतरे,बजरंग वाघमारे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज