फिनिक्स इंग्लिश स्कूलमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा

अकलूज दि.३ (प्रतिनिधी):स्त्री शिक्षणाच्या जनक,पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंतीनिमित्त लवंग येथील फिनिक्स इंग्लिश स्कूलमधील लहान मुला मुलींनी सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या वेशभूषा करून आज शाळेत आगमन झाले.त्यामुळे आज जुन्या काळातील आठवणींना उजाळा मिळाला.

या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन डॉ.दिपाली सोलणकर, गणेशगावच्या माजी सरपंच सौ.उषा ठोंबरे,रामचन्द्र ठोंबरे, पालक संघाचे अध्यक्ष रेवन भोळे, उपाध्यक्षा रुपाली मिटकल, नलिनी चव्हाण यांच्या हस्ते पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.त्यानंतर शाळेतील विद्यार्थी सारा नौशाद शेख,काव्या विकास चव्हाण,विजयलक्ष्मी रेवन भोळे, प्रियदर्शनी योगेश चव्हाण या विद्यार्थिनींनी सुरेल आवाजात ओवी गायली शाळेतील बऱ्याच मुली सावित्री मातेच्या वेशभूषेत तर मुले महात्मा ज्योतीबा फुले यांच्या वेशभूषा करून शाळेत हजेरी लावली होती.रामचंद्र ठोंबरे यांनी उपस्थित सर्व बालिका व महिलांना महिला मुक्ती दिनाच्या शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांना शालेय वस्तू भेट देऊन खाऊ वाटप केला .

शाळेच्या संचालिका नूरजहाँ शेख यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रयत्नांमुळेच मी आजची स्री भक्कम उभी आहे मी लेक सावित्रीची म्हणत भाषणास सुरुवात केली व सावित्रीमातेच्या संघर्षमय जीवन प्रवासाचा आढावा घेतला.या प्रसंगी उषा ठोंबरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की,सावित्री मातेने आमच्यासाठी खूप हाल अपेष्टा सहन केल्या परंतु त्यांनी कधी हार मानली नाही आपले हाती घेतलेले कार्य पूर्णत्वास नेले त्यांच्या कष्टाचे आज चीज झालेले दिसत आहे.त्यामुळेच आजची महिला सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत.गुलशन नशीब शेख मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज