पिलीव शहर मधील अंतर्गत रस्त्यातील खड्डे मुरमाने तत्काळ भरावे : सुभाष काकडे

प्रतिनिधी : यूवा सेना सचिव वरुण सरदेसाई, युवा सेना विभागीय सचिव अक्षय ढोबळे, युवा सेना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख उत्तम आयवळे व युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना माळशिरस तालुक्याच्या वतीने युवा सेना तालुका प्रमुख सुभाष काकडे यांच्या नेतृत्वाखाली पिलीव चे सरपंच नितीन मोहिते साहेब यांना निवेदन देण्यात आले.सद्या पावसाळ्याचे दिवस आहेत पीलीव शहरामध्ये रस्त्यांची दुरवस्था झाली असल्यामुळे खड्डे पडलेले आहेत. त्या खड्या मधे पावसाचे पाणी व चिखल जास्त प्रमाणात साचुन रोगराई निर्माण होऊन शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो . महाराष्ट्रामध्ये गणपती उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो त्याच खालोखाल पिलीव शहरामध्ये गणपती उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो .गणपती विसर्जन हे पिलीव च्या शहरांमधून केले जाते .गणपती विसर्जनावेळी पिलीव शहरा मधून गणपती चे विसर्जन हे मिरवणूक काढून आनंदाने विसर्जन केले जाते . शहरा मधे रस्त्यात खड्डे असल्यामुळे त्या खड्यात पाणी साचून चिखल तयार होत आहे त्यामुळे गणपती विसर्जन चे वेळी अनेक प्रकारचे अडथळे निर्माण होत आहेत त्यामुळे पिलीव शहरांमधील खड्डे तत्काळ भरून घ्यावेत आशी मागणी युवा सेना तालुका प्रमुख सुभाष काकडे यांनी केली आहे. यावेळी युवा सेना शहर प्रमुख देवा लोखंडे ,अजय खुर्द ,अंकुश भैस, मंगेश वाघमारे, अर्जुन लोखंडे, कुमार लोखंडे, तुषार राऊत, अविनाश मदने ई. युवा सैनिक उपस्थित होते

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज