पिलीव शहरातील विद्युत ताराना गार्डींग तत्काळ बसवा बसवण्यात यावे: सुभाष काकडे

प्रतिनिधी :-युवा सेना सचिव वरून सरदेसाई युवा सेना विभागीय सचिव अक्षय ढोबळे युवासेना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख उत्तम आयवळे व युवासेना जिल्हाप्रमुख गणेश दादा इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना तालुकाप्रमुख सुभाष काकडे यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता थोरात साहेब यांना निवेदन देण्यात आले. पिलिव मधील बाजार पेठेतील व शहरातील विद्युत प्रवाहाच्या तारा अत्यंत ढील्या झालेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना याचा धोका निर्माण झाला आहे.सद्या गणपतीचे दिवस आहेत पिलिव बाजार पेठेतून व पीलिव च्या शहरातून गणपती विसर्जनाची मिरवणूक वाजत गाजत निघत असते .विद्युत प्रवाहाच्या तारा ढिल्या असल्यामुळे गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत अडथळा निर्माण होऊन जिवीत हानी होऊ शकते. त्यामुळे या ढिल्या विद्युत प्रवाहाच्या तारा तत्काळ ओढून घ्याव्यात किंवा त्या ताराना गार्डींग बसवण्यात यावेत. अशी मागणी युवा सेनेच्या वतीने करण्यात आली आहे .यावेळी युवा सेना शहरप्रमुख देवा लोखंडे तुषार राऊत अंकुश भैस निखिल देशमुख अजय नाईक नवरे अर्जुन लोखंडे गौरव लोखंडे ई युवा सैनिक उपस्थित होते.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज