पत्रकारांशी उद्धटपणे वागणाऱ्या नेत्यांवरती कायदेशीर कारवाई करा— प्रेस व पत्रकार संघाचे तालुका उपाध्यक्ष प्रवीण अवचर

प्रतिनिधी :-गेल्या अनेक दिवसांपासून पत्रकारांवरती हल्ल्यांचे प्रमाण तसेच पत्रकारांशी उद्धटपणे वागण्याचे प्रमाण वाढलेले असून हे राजकीय पुढारी किंवा राजकारणाशी निगडित लोक पत्रकारांना धमक्या देतात त्यांना धक्काबुक्की करतात त्यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न करतात . लोकशाहीचा चौथा स्तंभ समजल्या जाणाऱ्या पत्रकारांना अशा प्रकारची वागणूक मिळत असेल तर हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. अशा लोकांवरती वेळीच कायदेशीर कारवाई करून त्यांना धडा शिकवायला हवा सर्व पत्रकार प्रेस संघटनाने एकत्र येऊन याचा निषेध करून अशा विद्युत लोकांच्या पत्रकार परिषदेला हजर राहू नये.याशिवाय या उद्धट नेत्यांना पत्रकारांची किंमत कळणार नाही.

देशासह राज्यांमध्ये प्रिंट मीडिया पोर्टल. च्या माध्यमातून हजारो पत्रकार कार्य करत आहेत. यामुळे शहरी व ग्रामीण भागातील विविध समस्यांना वाचा फुटत असून याचा जनतेला नक्कीच फायदा होत आहे.असे असताना देखील काही राजकीय नेते हे पत्रकारांशी उद्धट वागतात विरोधात बातम्या दिल्यास त्यांना धमक्या देतात परंतु अशा उद्धट राजकारण्यांची इथून पुढे गय केली जाणार नाही असा इशारा करमाळा तालुका पत्रकार प्रेस व पत्रकार संघाचे उपाध्यक्ष प्रवीण अवचर यांनी दिला आहे. तसेच मंत्री शंभूराजे देसाई यांनी पत्रकारांशी उद्धट वर्तन केल्याबद्दल त्यांचा करमाळा तालुका प्रेस व पत्रकार संघातर्फे जाहीर निषेध करण्यात आला.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज