प्रभू श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून प्रधानमंत्री सूर्योदय योजना जाहीर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठा करून पुन्हा कामाला सुरुवात करत प्रधानमंत्री सूर्योदय योजना जाहीर केली आहे.

   अयोध्यामध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले “प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर तर बनले तर पुढे काय? तर पुढील हजार वर्ष भारतावर परिणाम करेल, असे कार्य आता करायचे आहे. त्यानंतर लगेच आज कामाला सुरुवात करत त्यांनी प्रधानमंत्री सूर्योदय योजनेची घोषणा केली.

   

एक्स अकाऊंटवरून मोदींनी या योजनेची माहिती पोस्टद्वारे देत म्हटले, “सूर्यवंशी भगवान श्री रामाच्या आशीर्वादामुळे जगातील राम भक्तांना नेहमीच उर्जा मिळत असते. आज अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या शुभप्रसंगी माझा संकल्प आणखी दृढ झाला आहे की, भारतातील प्रत्येक नागरिकाच्या घरावर स्वतःची सौरऊर्जा यंत्रणा असावी. अयोध्येतून परतल्यानंतर मी पहिला निर्णय घेतला की, आमचे सरकार एक कोटी नागरिकांच्या घरावर रूफटॉप सोलार पॅनल लावण्यासाठी प्रधानमंत्री सूर्योदय योजनेची सुरूवात करत आहे. यामुळे गरीब आणि मध्यम वर्गाला विज बिल कमी येईलच. त्याशिवाय ऊर्जा क्षेत्रात भारत आत्मनिर्भर होईल.”

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज