प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयासमोर भजन आंदोलन

प्रतिनिधी :-माढा तालुक्यातील पी एम किसान सन्मान योजनेतील बऱ्याच शेतकऱ्यांच्या त्रुटी आहेत. सदर त्रुटींची पूर्तता करण्यासाठी शेतकरी कृषी विभाग व तहसील कार्यालयात वारंवार जात असून कृषी विभाग हा विषय आमचेकडे नाही तो तहसील कडे आहे व तहसील कडील अधिकारी हा विषय आमचेकडील नाही तो कृषी विभागाचा आहे असे म्हणून शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे शेतकरी हा एका ऑफिस कडून दुसऱ्या ऑफिस कडे हेलपाटे मारत आहेत. परंतु कोणतीही ठोस कारवाई होत नाही.त्यामुळे सदर योजनेपासून शेतकरी वंचित राहत आहेत.तसेच नवीन नोंदी बाबतही कृषी विभाग सकारात्मक दिसत नाही.तसेच त्रुटी पूर्ततेसाठी व नवीन नोंदणी साठी अवाढव्य पैशाची मागणी केली जात आहे.*

 

तसेच सॉईल चार्जर खत कंपनीचे खत बोगस असल्याबाबत गेली सहा महिन्यापूर्वी तक्रार करून सँपल दिले होते परंतु त्या बाबत कोणताही अहवाल अजून ही दिला नाही. याबाबत पाठपुरावा केला असता तालुका कृषी अधिकारी पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्याकडे हा विषय आहे व पंचायत समिती अधिकारी पवार साहेब तालुका कृषी अधिकारी कडे हा विषय आहे अशी मुद्दाम चाल ढकल करत आहेत.याबाबत संगण मताने कारवाईस टाळाटाळ करीत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्यांच्या वर कारवाई करण्यासाठी व त्यांना सद्बुद्धी देण्यासाठी प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या कार्यालयासमोर 3 ऑक्टो रोजी भजन आंदोलन करण्यात येईल. असे पत्र प्रहर शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे. त्या प्रसंगी जिल्हा समन्वयक पंडित साळुंके , तालुका संपर्क प्रमुख राजाभाऊ शिंदे, विद्यार्थी तालुका उपाध्यक्ष संतोष कोळी, तालुका संघटक संभाजी उबाळे, किरण लवटे, ज्ञानेश्वर गवळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज