प्रहार शेतकरी संघटनेचे यश, मा. अप्पर मुख्य सचिव कृषी मंत्रालय मुंबई यांचा विमा कंपनीला 25 टक्के अग्रिम रक्कम देण्याबाबत आदेश

प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने 24/11/2023 रोजी जिल्हा कृषी अधीक्षक यांना तूर , कांदा या पिकांना विम्याची अग्रिम 25 टक्के रक्कम मंजूर करण्यात यावी या बाबत पत्र देत 12/12/2023 रोजी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयासमोर प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने हालगी नाद आंदोलन करण्यात येईल असे निवेदन देण्यात आले होते. विमा कंपनीने तूर, कांदा या इतर पिकांसाठी 21 दिवसाचा खंड मान्य नसल्या कारणाने मा.अप्पर मुख्य सचिव कृषी मंत्रालय, मुंबई यांच्याकडे अपील केले होते. प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने दिलेल्या पत्राची दखल घेत पत्राला अनुसरून मा.अप्पर मुख्य सचिव कृषी मंत्रालय मुंबई यांनी तत्काळ दिनांक 5 डिसेंबर 2023 रोजी मीटिंग घेत जिल्हा अधिकारी सोलापूर यांच्या अधिसूचनेनुसार पीक विमा धारक शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रिम नुकसान भरपाई तत्काळ देणे बाबत कंपनीला सूचित केले आहे. त्यामुळे प्रहार शेतकरी संघटनेचे आजचे हालगी नाद आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे.

लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर 25 टक्के अग्रिम रक्कम जमा होईल.जो पर्यंत सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्यांची 25 टक्के अग्रिम रक्कम नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत प्रहार शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या सोबत राहील

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज