प्रहार शेतकरी संघटनेच्या माध्यमातून मोहोळ तालुक्यातील शेतकरी सोमनाथ बळवंतराव याना मुख्यमंत्री सहाय्यता निधी मंजूर

प्रतिनिधी :- मोहोळ तालुक्यातील वाघोली वाडी येथील शेतकरी सोमनाथ गोरख बळवंतराव यांच्या मेंदूच्या शस्त्र क्रियेसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एक लाख रुपये वैद्यकीय मदत निधी मंजूर करन्यात आला आहे. प्रहार शेतकरी संघटनेच्या जिल्हा समन्वयक पंडित साळुंके यांच्या प्रयत्नातून आणि मा. राज्यमंत्री बच्चु भाऊ कडू यांच्या शिफारशीने मंजूर झाला आहे. सोमनाथ गोरख बळवंतराव हे सोलापूर येथील सी. एस. एन या हॉस्पिटल मध्ये उपचार घेत आहेत. त्यांची परिस्थिती हालाखीची असल्याने प्रहार शेतकरी संघटनेच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबाला फार मोठी मदत झाली आहे.

यावेळी जिल्हा समन्वयक पंडित साळुंके म्हणाले की मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून शासनाने फार मोठ्या प्रमाणात निधी देऊन गोरगरिब कुटुंबाला आधार देण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी केले आहे. प्रहार शेतकरी संघटना कायमच सर्वसामान्य माणसाच्या, गोरगरिबांच्या , पाठीशी उभी आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे पत्र पेशंटचे नातेवाईक संतोष कोळी यांच्या हाती देण्यात आले. त्या प्रसंगी जिल्हा समन्वयक पंडित साळुंके, तालुका अध्यक्ष अमोल केसरे, किरण लवटे, गणेश पारडे , गणेश नाईकवाडे, विशाल लोंढे, धीरज भांगे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज