प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयात रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा

प्रतिनिधी :-
बहीण भावाच्या पवित्र प्रेमाची साक्ष देणारा रक्षाबंधन हा सण प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शाखा अकलूजच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माळशिरसचे गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख उपस्थित होते.
या सणाच्या निमित्ताने ब्रम्हाकुमारी बहिणींकडून उपस्थित सर्वांना राखी बांधण्यात आली.यावेळी रक्षाबंधनाचे अध्यात्मिक रहस्य सांगताना शाखेच्या संचालिका शिवरात्री बहेनजी यांनी सांगितले की,आपणां सर्वांचे रक्षण एक परमपिता परमात्माच करू शकतो.कारण की तो सर्वशक्तिमान आहे.यासाठी सर्व मनुष्य आत्म्यांना त्याचे पवित्र बंधन बांधावे लागेल.संस्थेचे मनुष्य आत्म्यात शांती प्रास्थापित करणे व समाजात वसुधैव कुटुंबकम ची भावना निर्माण करण्याचे संस्थेचे काम मोठे असल्याचे गौरवोद्गार यावेळी गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख यांनी काढले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदलिंगे यांनी केले.तर आभार बी‌.के.प्रिती बहेनजी यांनी मानले.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज