प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने रुग्णाना फळं वाटप

प्रतिनिधी (देवणी ): प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने वाढदिवसानिमित्त श्रद्धा रुग्णालयातील रुग्णाना फळं वाटप करण्यात आले.

देवणी शहरात श्रध्दा हाॕस्पिटल अनोख्या पध्दतीने रुग्णाना सेवा देत आहे. ग्रामीण भागातील रूग्णांना अल्प दरात, उत्तम आरोग्य सेवा देण्याचे काम डॉ संतोष बिरादार अटृरगेकर यांच्या माध्यमातून केले जात आहे म्हणून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण रणदिवे यांच्या श्रीशांत व सुशांत रणदिवे या दोन्ही मुलाच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळं वाटप

करून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे देवणी तालुका अध्यक्ष लक्ष्मण रणदिवे, डॉ, संतोष बिरादार अटृरगेकर, उपेक्षित लोककलावंत व निर्धार मजुर पुनर्वसन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष वसंत बिबिनवरे टाकळीकर, मनसेचे युवा नेते सुरज रणदिवे, मदन पाटील, पंढरी जोळदापके, उपसरपंच गजानन गायकवाड अजणीकर,भैयासाहेब देवणीकर, पत्रकार जयश ढगे, कृष्णा पिंजरे, तोबरे शाहुराज, सय्यद जाफर, राजकुमार सुर्यवंशी, काशिनाथ पांचाळ, आरती आतंरेड्डी, छाया सुर्यवंशी, चांदणी बिरादार, नसीमा शेख, शाम बिरादार, दिनकर बिरादार आदी पदाधिकारी, पत्रकार व मान्यवर उपस्थित होते.

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ देवणी तालुका कार्यकारिणीने उत्कृष्ट उपक्रम राबविल्याबद्दल संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, राज्य महिला अध्यक्षा डॉ सुधाताई कांबळे, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, लातूर जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे, महिला जिल्हाध्यक्षा वैशालीताई पाटील, जिल्हा संघटक संजय राजुळे, राज्य, विभाग, जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज