प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची ढाणकी कार्यकारिणी जाहीर

ढाणकी, यवतमाळ : महाराष्ट्र राज्यातील पत्रकार यांच्या हक्क अधिकारासाठी नेहमी कर्तव्यदक्ष असलेली पत्रकार संघटना म्हणून नावलौकिक असलेली प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची दिनांक ०१ जानेवारी,२०२३ रोजी ढाणकी येथे नूतन वर्षासाठी कार्यकारिणी गठित करण्यात आली.

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी टी आंबेगावे व विदर्भ अध्यक्ष केशव सवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अध्यक्ष अनिल राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत ढाणकी येथे कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या ढाणकी अध्यक्षपदी निलेश पिलवंड, उपाध्यक्षपदी दिगंबर शिरडकर तर सचिवपदी महेबुब शेख यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच सहसचिव मोणुदिन सोदागर, सल्लागार कमलाकर दुलेवाड, कोषाध्यक्ष संदेश कांबळे, संघटक प्रविण जोशी तर सहसंघटक शेख रमजान तर सदस्य म्हणून अशोक गायकवाड, तेजस तुपेकर, बंटी फुळकोंडवार, ऋषिकेश कोंडेवाड, रवी डोंगे, विलास अडागळे, संतोष पांडे, संदीप वायकोले, ऋषिकेश नफते, संदीप वाघमारे, उत्तम सोनुने, अजीस खान कदिर खान आदी पत्रकारांची निवड करण्यात आली.

या सर्व निवडी सन २०२४ ते २०२५ या कालावधीसाठी असून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या विचारांशी निगडित राहून समाजहिताचे कार्य करेल. पत्रकारांच्या हक्क व अधिकारासाठी सातत्याने पुढाकार घेण्यात येईल असे विचार नवनिर्वाचित अध्यक्ष निलेश पिलवंड यांनी व्यक्त केले. यावेळी पत्रकार उपस्थित होते.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज