पुणे येथील प्रसिद्ध गायक प्रवीणकुमार अवचर यांचा सर्वोत्कृष्ट गायक व म्युझिक डायरेक्टर म्हणून सन्मान

प्रतिनिधी :- प्रवीण कुमार अवचर हे गेली दहा वर्षापासून लायन्स क्लब इंटरनॅशनल साठी त्यांच्या ऑर्केस्ट्राचे कार्यक्रम करत असून त्यांनी लायन्स क्लब साठी मोटिवेशनल (प्रेरणादायी) गाणी स्वतः गायली आहेत व संगीतबद्ध केलेली आहेत. बहारदार आवाज व उत्कृष्ट संगीत संयोजन असल्यामुळे ही गाणी लायन्स क्लब मध्ये खुप प्रसिद्ध झालेली आहेत. यासाठी पुणे येथील संगीत संयोजक एन .बापु व गायिका शितलजी यांचे ही मोलाचे सहकार्य लाभलेले आहे. तसेच पुणे येथील प्रसिद्ध उद्योगपती,प्रसिद्ध कवी, गीतकार ,लेखक द्वारकादास जालन यांनी अतिशय सुरेख पद्धतीने ही सर्व गीते लिहिलेली आहेत. काल पुणे येथील टीप टॉप इंटरनॅशनल हॉटेलमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात श्री प्रवीणकुमार यांना लायन्स क्लब इंटरनॅशनल चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर विजयजी भंडारी, लायन द्वारकाजी जालन, राजेंद्रजी गोयल, राजेंद्रजी राठोड या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र राज्य व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष फतेहसिंह रांका, दीपक शहा, शाम खंडेलवाल , शैलेश भाई शहा ,राजेंद्र गोयल, संतोष पटवा, रमेश भाई शहा यांचेसह महाराष्ट्रासह देशभरातून आलेले लायन्स क्लब इंटरनॅशनल चे सदस्य व प्रवीणकुमार यांचा म्युझिक कलर्स ऑर्केस्ट्राचे कलाकार उपस्थित होते.
यानिमित्त प्रवीणकुमार यांचे राजकीय ,सामाजिक ,वैद्यकीय, शैक्षणिक ,उद्योजक क्षेत्रातील अनेक मान्यवरांकडून तसेच मित्र परिवाराकडून विशेष कौतुक केले जात आहे

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज