पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरच्या १९ व्या युवा महोत्सवासाठी अकलूजच्या शंकरराव मोहिते महाविद्यालयाची जोरदार तयारी

प्रतिनिधी:-
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरचा 19 वा युवक महोत्सव स्वेरीज कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पंढरपूर या ठिकाणी १० ते १३ ऑक्टोंबर २०२३ मधे संपन्न होत असून अकलूजच्या शंकराव मोहिते महाविद्यालयाचा संघ ३९ कला प्रकारात सज्ज असून जोरदार तयारी सुरू आहे.

चालू वर्षात सुरू झालेल्या लोककला आणि पाश्चिमात्य संगीत या विभागाची सुद्धा विजेतेपद मिळवण्याची मोहोर महाविद्यालयाच्या मार्फत सुरू आहे.आतापर्यंत महाविद्यालयाने 1 वेळा सर्वसाधारण विजेतेपद,६ वेळा उपविजेतेपद,३ वेळा तृतीय विजेतेपद मिळवलेली असून गोल्डन बॉय हा पुरस्कार दोन वेळा मिळवलेला आहे.तरी यावर्षी सर्वसाधारण विजेतेपद मिळवण्यासाठी संघातील सर्व कलाकार सकाळी आठ पासून ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत सराव करताना दिसत आहेत.हा सर्व संघ डॉ.विश्वनाथ आवड,डॉ. अपर्णा कुचेकर,डॉ चंकेश्वर लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी सुरू केलेली आहे.यासाठी प्रशिक्षक म्हणून प्रा.रोहित देशमुख,वैभव आंबेकर,औदुंबर भिसे,सिने कलाकार योगीराज भिसे,प्रा.पंकज पवार,मनोज वर्धम,सूरज ननवरे यांची नियुक्ती केलेली असून सर्व संघासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते-पाटील,अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील,कु.स्वरूपाराणी मोहिते-पाटील,सचिव अभिजीत रणवरे,सहसचिव हर्षवर्धन खराडे-पाटील,प्राचार्य.डॉ.दत्तात्रय बागडे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज