पुरंदावडे येथे भक्तिमय वातावरणात रंगणार श्री रेणुका माता देवीची यात्रा

अकलूज दि.१९ (प्रतिनिधी):पुरंदावडे (ता.माळशिरस) येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री रेणुका माता यात्रेचे आयोजन दि. २२ ते दि.२४ डिसेंबर या तीन दिवशी करण्यात आले आहे.

शुक्रवार दि.२२ डिसेंबर रोजी श्री रेणुका माताला साडी चोळी करून यात्रेस प्रारंभ होणार आहे.त्याच दिवशी संध्याकाळी ४ ते ५ वा. व रात्री ७ ते १० वा. नाळेमळा येथे माहेरघरी कार्यक्रम संपन्न होणार आहे.शनिवार दि. २३ रोजी गंध लिंब दुपारचा महानैवेद्य व करमणुकीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.रविवार दि.२४ रोजी गावातून सकाळी ९ ते ४ वाजेपर्यंत छबिना व ४ वाजता होमाचा (किच) कार्यक्रम होणार आहे.

तरी पुरंदावडे व पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रेणुका माता देवीचे पुजारी जगूबाई बाजीराव मोहिते,शिवाजी बाजीराव मोहिते, दादासो शिवाजी मोहिते, आदित्य दादासाहेब मोहिते यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज