राहुल गांधींचं ॲड.प्रकाश आंबेडकरांना आमंत्रण

 

प्रतिनिधी: राहुल गांधी यांनी ६७ दिवसांची १५ राज्यांतून जाणारी भारत जोडो न्याय यात्रा सुरू केली आहे. राहुल गांधींनी मणिपूर मधुन 14 जानेवारीपासून भारत जोडो न्याय यात्रेची सुरुवात केली आहे. या भारत जोडो न्याय यात्रेमध्ये सामील होण्यासाठी राहुल गांधी यांनी ॲड. प्रकाश आंबेडकर यांना आमंत्रण दिले आहे. या बाबतची माहिती ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या ट्विटर खात्यावरून दिली आहे.

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सशर्त आमंत्रण स्वीकारले आहे.वंचित बहुजन आघाडीला अद्याप INDIA अलायन्स आणि महविकास आघाडी मध्ये सामील केले गेले नाही. 

INDIA आणि महविकास आघाडी मध्ये सामील न होता यात्रेत सामील झाल्यामुळे युतीची अटकळ बांधली जाईल, जी अद्याप पूर्ण झालेली नाही. म्हणून, ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधींना विनंती केली आहे की, त्यांनी वंचित बहुजन आघाडीला INDIA अलायन्स आणि महविकास आघाडी या दोन्हींसाठी आगोदर आमंत्रण पाठवावे.

 

 

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज