राज्यस्तरीय पुरस्कारासाठी आवाहन

अकलूज ता.२७: भारतीय दलित संसद व प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्यावतीने ज्या खेळाडूंनी राष्ट्रीय पातळीवर यश प्राप्त केले आहे अशा खेळाडूंचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे तरी खेळाडूंनी आपले प्रस्ताव पाठवावेत असे आवाहन जिल्हाध्यक्ष सोमनाथ खंडागळे यांनी केले.

साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त भारतीय दलित संसद व प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने विविध क्षेत्रातील कार्य करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. यावर्षी राज्य स्तरीय क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या पाच खेळाडूंना पुरस्कार देण्यात येणार आहेत, तरी आपले प्रस्ताव 22ऑगस्ट पर्यंत
‘बिग बी आय टी पॉईंट’ नवीन एसटी स्टँड समोर, बजाज फायनान्स शेजारी आयसीआयसी बँकेच्या पाठीमागे मु. पो. अकलूज तालुका- माळशिरस जिल्हा -सोलापूर या पत्त्यावर पाठवावेत. अधिक माहितीसाठी
मो. नं 9890119559. 8600270199. 9423526244 वर संपर्क साधावा असे आवाहन श्री खंडागळे यांनी केले.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज