शिवशंकर बझारच्या पणती व रांगोळीच्या स्टॉलचे पो.नि. दिपरतन गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन

अकलूज : ना नफा ना तोटा तत्वावर कार्यरत असणार्‍या शिवशंकर मध्यवर्ती सहकारी ग्राहक संस्थेच्या ‘शिवशंकर बझार’ येथे खास दिवाळी सणासाठी ग्राहकांच्या सोयीच्या दृष्टीकोनातून रांगोळीच्या स्टॉलची स्वतंत्र उभारणी करण्यात आली असून याचा शुभारंभ अकलूज पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी व्हाईस चेअरमन मदन भगत, संचालक ॲड.नितीन खराडे, अर्जुन भगत, अनिल मुंडफणे, कैलास ताटे, व्यवस्थापक गोपाळराव माने-देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

     राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या आशिर्वादाने व उद्योगमहर्षि कै.उदयसिंह मोहिते-पाटील यांच्या दूरदृष्टी संकल्पनेतून 28 वर्षापूर्वी सुरू झालेला शिवशंकर बझार चेअरमन डॉ.स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली व किर्तीध्वजसिंह मोहिते-पाटील व शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या ध्येयधोरणाखाली यशस्वीरित्या वाटचाल करीत आहे.

        सालाबाद प्रमाणे याही वर्षी गर्दी टाळण्यासाठी व ग्राहकांची उत्तमप्रकारे सोय व्हावी यासाठी पणती व रांगोळीचे स्वतंत्र स्टॉल उभारण्यात आले आहेत. यामध्ये विविध प्रकारच्या पणत्या, आकाशदिवे, रंगीबेरंगी रांगोळी, किल्ले, मावळे, खापर पणती, मेणाची पणती माफक दरात विक्रीस उपलब्ध केली आहे. शिवाय ग्राहकांच्या हिताला प्राधान्य देऊन अत्यंत माफक दरात विविध प्रकारच्या गृहपयोगी वस्तूंचीही वेगवेगळ्या स्टॉलच्या माध्यमातून 5 ते 50 टक्क्यांपर्यंत सूट देत विक्री करण्यात येत आहे. अकलूजच्या मुख्य शाखेबरोबरच तालुक्यातील इतर 8 शाखेतही विक्री करण्यात येत असल्याची माहिती व्यवस्थापक गोपाळराव माने-देशमुख यांनी दिली.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज