रणजीत कांतीलाल गायकवाड यांची जिल्हा प्रमुखपदी निवड

अकलूज दि.१४ (प्रतिनिधी):श्री शिवशंभू चारिटेबल ट्रस्ट (महाराष्ट्र राज्य) चे माळशिरस तालुक्यात सामाजिक केलेल्या कामाची पोचपावती म्हणून रणजीत कांतीलाल गायकवाड यांची श्री शिवशंभू चारिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्याच्या सोलापूर ग्रामीण विभाग जिल्हाप्रमुख म्हणून निवड झाली आहे  

महाराष्ट्रातील ग्रामीण भागात सामाजिक उपक्रम आयोजित करून अनेक गरजुंना मदत करणे तसेच महाराष्ट्र राज्यभर रक्तदान शिबीर आयोजित करण्यात अग्रेसर असणारे नाव म्हणजे श्री शिवशंभू चारिटेबल ट्रस्ट आहे.सदर ट्रस्ट मार्फत माळशिरस तालुक्यात २५ पेक्षा जास्त रक्तदान शिबीर आयोजित करून जवळपास दिड हजार ब्लड बॅगचे संकलन करून तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील गरीब गरजू लोकांना ब्लड बॅग आगदी मोफत देऊन रणजित गायकवाड यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्याचबरोबर दुष्काळी भागात गोरगरीबांना अन्नधान्याची मदत करणे तसेच पुर परिस्थती निर्माण झाली होती तेव्हा ट्रस्टच्या माध्यमातून एक हात मदतीचा हा उपक्रम राबवून मोठी मदत जमा करून गरजुंना पाठविले असे विविध सामाजिक उपक्रम राबवून आपली सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम रणजीत गायकवाड यांनी केलेले आहे. त्यांचे हे कार्य डोळ्यासमोर ठेवून श्री शिवशंभू चारिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष भुषणदादा सुर्वे यांनी रणजीत कांतिलाल गायकवाड यांची माळशिरस तालुका प्रमुख पदावरून सोलापूर जिल्हा ग्रामीण विभाग जिल्हाप्रमुख पदी निवड केली आहे.त्याबद्दल त्यांचे विविध स्तरावरून अभिनंदन वर्षावर होत आहे.

या निवडी प्रसंगी बोलताना रणजीत गायकवाड म्हणाले की,श्री शिवशंभू चारिटेबल ट्रस्ट मार्फत सामाजिक कार्य करत असताना कधीच स्वर्थ बघीतला नाही.त्यामुळे ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष भुषणदादा सुर्वे यांनी माझ्यावर हि मोठी जबाबदारी दिली आहे.इथुन पुढे भुषणदादा सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली अजुन ताज्या दमाने श्री शिवशंभू चारिटेबल ट्रस्टचा नावलौकिक वाढवायचा प्रयत्न करेन.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज